नागपूर : प्रेयसीला घेऊन लॉजवर आलेल्या प्रियकराने शरीरिक संबंध प्रस्थापित करण्यापूर्वी स्टॅमिना वाढविण्यासाठी गोळ्या घेतल्या. मात्र, त्या गोळ्यांचे प्रमाण जास्त झाल्यामुळे प्रियकराचा शरीरिक संबंध करतानाच मृत्यू झाला. ही घटना रविवारी एका लॉजमधे उघडकीस आली. अजय परतेकी असे मृत्यू पावलेल्या युवकाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अजय परतेकी याचे गेल्या तीन वर्षापासून एका युवतीशी प्रेम संबंध आहेत. ती युवती एका खाजगी रुग्णालयात परिचारिका म्हणून काम करते. गेल्या काही महिन्यांपासून ते नियमितपणे सावनेरमधील एका लॉजवर जात होते.
रविवारी दोघांनाही सुट्टी असल्यामुळे त्यांनी लॉजवर जाण्याचे नियोजन केले. रविवारी दुपारी एक वाजताच्या सुमारास त्यांनी १०२ क्रमांकाची रूम बुक केली. तासाभरातच ती प्रेयसी धावतच्या लॉजच्या काउंटरवर आली. तिने लॉजच्या व्यवस्थापकाला प्रियकराची प्रकृती बिघडल्याची सांगितले. तत्काळ ते दोघेही रूममध्ये गेले. तिचा प्रियकर अजय हा बेशुद्ध अवस्थेत पडलेला होता. त्यांनी लगेच वाहन करून अजयला रुग्णालयात हलवले. डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले.
अजयच्या प्रेयसीच्या माहितीनुसार, शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यापूर्वी अजयने स्टॅमिना वाढवण्याच्या काही गोळ्या सेवन केल्या होत्या.
त्या गोळ्यांचे प्रमाण अधिक झाल्यामुळे अजयची प्रकृती ढासळली. बेशुद्ध पडून त्याचा मृत्यू झाला, अशी माहिती वैद्यकीय निदानात समोर आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तूर्तास आकस्मिक मृत्युची नोंद केली आहे.