नागपूर : भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या नावाने नागपूर विमानतळावर नोकरी दिली जात असल्याचे सांगून युवकांची आर्थिक फसवणूक केल्याची

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अनेक प्रकरणे नागपूर विमानतळावर समोर आली आहेत. परंतु प्रशासन आणि पोलीस याची गंभीर दखल घेण्यास असमर्थ ठरले आहेत. त्यामुळे वारंवार असे प्रकार घडत आहेत.

नागपूर विमानतळावर विविध पदांवर नियुक्ती करण्यात येत आहे, असे संदेश व्हॉट्सअ‍ॅपवर पसरवण्यात येत आहे. त्यानंतर युवकांना संबंधित संकेतस्थळांवर अर्ज करावयास लावले जाते. ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर व्हॉट्सअ‍ॅपवर निवड झाली आहे. नियुक्ती तारीख असलेले पत्र संबंधितांना पाठवण्यात येते. त्यात आरोग्य तपासणीसाठी १६ हजार रुपये दिलेल्या बँक खात्यावर जमा करा. ही रक्कम रिफंडेबल आहे, असेही पत्रात नमूद असते. तेवढी रक्कम जमत नाही, असे म्हटल्यास सध्या अर्धी भरा, नंतर उर्वरित रक्कम भरा, असे सुचवण्यात येते. अर्धी रक्कम भरल्यानंतर दोन-तीन दिवसांनी उर्वरित रक्कम भरण्यास भाग पाडले जाते. नियुक्तीच्या दिवशी नागपूर विमानतळावर जेव्हा युवक येतात आणि ते नियुक्ती पत्र दाखवतात, तेव्हा येथील कर्मचारी, सुरक्षा कर्मचारी बनावट पत्र आहे. असे दर दोन-तीन दिवसांनी युवक येतात, असे सांगितले जाते. तेव्हा युवक निराश, हताश होऊन घरी परततात. या फसवणुकीबद्दल पोलिसात तक्रार करण्याचे बळ सुद्धा त्यांच्यात उरत नाही. असे प्रकार गेल्या दोन-तीन वर्षांपासून सातत्याने घडत आहेत, असे विमातळावरील वरिष्ठ अधिकारी सांगतात. यासंदर्भात दोन वर्षांपूर्वी बुटीबोरी पोलिसांत तक्रार करण्यात आली.

हा सायबर गुन्हा आहे. याचा तपास पोलिसांना करावा लागेल, असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. परंतु भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या नावाचा वापर करून बरोजगार युवकांची फसवणूक होत असल्याबद्दल कोणी अधिकृतपणे तक्रार करीत नाहीत.

अशी झाली फसवणूूक

अलीकडे चंद्रपूर जिल्ह्य़ातील दोन युवकांची फसवणूक झाली. परंतु घाबरून गेलेल्या आणि पोलिसांचा ससेमिरा आपल्याच मागे लागेल म्हणून त्यांनी पोलिसात तक्रार केली. ७३०९७ २८९६४ आणि  ७०६५६ ४२६७८ या क्रमांकावरून कॉल आले होते. त्यांना कमाल याच्या भारतीय स्टेट बँकेतील खाते क्रमांक ३४४४८३५६४५६ रक्कम जमा करण्यास सांगण्यात आले. बँक शाखेच्या आयएफएससी क्रमांक एसबीआय एन ०००४८४८ सांगण्यात आला होता. त्यावर एकाने पहिल्यांदा तीन हजार आणि नंतर १२ हजार जमा केले. तसेच दुसऱ्याने पहिल्यांदा दहा आणि नंतर सहा हजार जमा केले.

युवकांनी वर्तमानपत्रात जाहिरात आल्याशिवाय कोणत्याही संकेतस्थळावर (लिंक) अर्ज करू नये. तसेच छोटय़ा जाहिरातीवरही विश्वास ठेवू नये. अर्ज भरतानाच जाहिरातीबद्दल शहानिशा करून घ्यावी.

– विजय मुळेकर, वरिष्ठ संचालक, नागपूर विमानतळ.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Youth cheated in the name of job at airport zws
First published on: 27-08-2019 at 02:08 IST