लोकसत्ता प्रतिनिधी

जळगाव: शहरातील मेहरुण परिसरातील ३६ एकर जागेत विभागीय क्रीडा संकुलाच्या कामांसाठी २४० कोटींच्या खर्चास, तसेच जामनेर येथे तालुका क्रीडा संकुल उभारण्यासाठी ३९ कोटींच्या खर्चास प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. यासाठी तत्कालीन क्रीडामंत्री व सध्याचे ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांनी पाठपुरावा केला होता.

सध्या नाशिक, धुळे, जळगाव व नंदुरबार या चार जिल्ह्यांसाठी नाशिक येथे विभागीय क्रीडा संकुल कार्यरत आहे. जळगाव आणि धुळे या दोन जिल्ह्यांसाठी जळगावमधील मेहरुण परिसरात ३६ एकर जागेत विभागीय क्रीडा संकुल उभारण्यास जागा मंजूर आहे. रक्कम मंजूर झाल्याने क्रीडा संकुलाच्या कामास आता गती येणार आहे. लवकरच बांधकामासाठीची पुढील प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे.

हेही वाचा… जळगाव महापालिकेवर आता प्रशासक; आयुक्तांच्या हाती कार्यभार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संकुलात विविध खेळांची मैदाने, धावपटूंसाठी धावन मार्गिका, बास्केटबॉल, व्हॉलिबॉलसाठी मैदान, टेनिस कोर्ट आदींसह खेळाडूंना लागणार्‍या अद्ययावत सोयी- सुविधांसह तज्ज्ञ प्रशिक्षक उपलब्ध होणार असल्याचे ग्रामविकासमंत्री महाजन यांनी सांगितले.