नाशिक: गुजरातमधील बारडोली शहराजवळ शुक्रवारी पहाटे मालमोटर अपघातात नाशिकच्या बागलाण तालुक्यातील तीन मजुरांचा जागीच मृत्यू झाला. पाच जण जखमी आहेत. डाळिंब छाटणी करण्यासाठी बागलाण तालुक्यातील खमताणे परिसरातील छाटणी कामगार भाजीपाला वाहतूक करणाऱ्या मालमोटारीने सुरतकडे निघाले होते. बारडोलीजवळ चालकाचे नियंत्रण सुटल्याने मालमोटार उलटली. या अपघातात पिंटू पवार (४०), सोनू मोरे (३५), भाऊसाहेब बागूल (५०, तिघेही खमताणे) यांचा जागीच मृत्यू झाला.

हेही वाचा : नाशिक: लाच स्वीकारताना पोलीस नाईक जाळ्यात

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 3 workers from nashik died in road accident at gujarat css
First published on: 24-05-2024 at 16:31 IST