नाशिक: पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात अटक न करता न्यायालयात पाठवून मदत करण्यासाठी पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना लासलगाव पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक कैलास बिडगर यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. निफाड तालुक्यातील डोंगरगाव येथील तक्रारदार हे शेतकरी आहेत. त्यांच्याविरुद्ध लासलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस नाईक कैलास बिडगर (४२) याच्याकडे आहे. या गुन्ह्यात तक्रारदाराला अटक न करता न्यायालयात पाठवून मदत करण्यासाठी त्याने १० हजार रुपयांची लाच मागितली. तडजोडीअंती पाच हजार रुपये देण्याचे ठरले. या संदर्भात तक्रार आल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचला. तक्रारदाराकडून पाच हजार रुपयांची लाच स्वीकारत असताना पोलीस नाईक बिडगरला पथकाने पकडले. गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

हेही वाचा : फसवणुकीसाठी ‘लष्कर ए तय्यबा’ नावाने भ्रमणध्वनी, धुळ्यात दोघांना अटक

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In nashik at lasalgaon police arrested while accepting bribe of rupees 5 thousand css
First published on: 24-05-2024 at 16:24 IST