जळगाव – अमळनेर येथे होणाऱ्या ९७ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात यंदा आयोजकांकडून डिजिटल तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर करण्यात येत आहे. संमेलनाच्या पारंपरिक परंपरेला यंदा डिजिटल टच देण्यात आला आहे. संमेलनाशी निगडित प्रश्न व शंकांचे निरसन करण्यासाठी प्रथमच चॅटबॉट, क्यूआर कोडसारख्या तंत्रज्ञानाचा प्रभावीपणे वापर करण्यात येत आहे. या प्रणालीच्या माध्यमातून व्हॉट्सअॅपवर संमेलनाशी संबंधित प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत. याशिवाय, संमेलनाच्या प्रसिद्धीसाठी रिल्स, व्हिडिओ आणि समाज माध्यमांचाही वापर होत आहे.

अमळनेर येथील प्रताप महाविद्यालयात साकारण्यात येत असलेल्या पूज्य साने गुरुजी साहित्यनगरीत साहित्य संमेलन दोन ते चार फेब्रुवारी या कालावधीत होत आहे. संमेलनाचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ साहित्यिक प्रा. डॉ. रवींद्र शोभणे भूषविणार असून, संमेलनाचे उद्घाटन लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्या हस्ते होणार आहे. संमेलनाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार उपस्थित राहणार आहेत.

Sangli, Vasant Keshav Patil,
सांगली : साहित्यिक वसंत केशव पाटील यांचे निधन
Sham Kurle
बालसाहित्य शाम कुरळे बेपत्ता; कोल्हापुरात दिसल्याचे काहींचे दावे
India to get above normal rain
दिलासा; यंदा उत्तम पावसाचा अंदाज
Dram Hridayangam picture and biography of village culturea
नाट्यरंग: ‘मुक्काम पोस्ट आडगाव’; ग्रामसंस्कृतीचं हृदयंगम चित्र आणि चरित्र

हेही वाचा…मोदींच्या नाशिक दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर काळाराम मंदिर सुशोभिकरणासाठी दोन कोटींचा निधी

संमेलनात तंत्रज्ञानाचा वापर करून सर्वांना यात जोडण्याचा प्रयत्न आहे. युवावर्गालाही संमेलनात सहभागी करून घेण्यासाठी समाजमाध्यमांतून त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जात असून, त्यात तरुणाईकडून मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे मराठी वाङ्मय मंडळाचे अध्यक्ष डॉ. अविनाश जोशी यांनी सांगितले. संमेलनाची जय्यत तयारी सुरू असून, संमेलनाचा उत्साह संपूर्ण खान्देशात दिसून येत आहे.

प्रताप महाविद्यालयात उभारण्यात येत असलेल्या साने गुरुजी साहित्यनगरीचे कामही अंतिम टप्प्यात आले आहे. वेगवेगळ्या सभागृहांची आखणी, ग्रंथप्रदर्शन दालन उभारणी जागेचे सपाटीकरण, परिसरातील अंतर्गत रस्ते बांधकाम, स्वच्छतागृह उभारणी, वाहनतळ व्यवस्था आदी कामे जोमाने सुरू आहेत.

हेही वाचा…जळगाव जिल्ह्यात हवालदारासह खासगी व्यक्ती लाचलुचपत प्रतिबंधकच्या जाळ्यात

चॅटबॉट कसे काम करणार ?

संमेलनाशी संबंधित माहिती मिळविण्यासाठी सर्वप्रथम ९५२९२१६३५५ हा क्रमांक भ्रमणध्वनी संचात टाकावा लागेल. या क्रमांकावर नमस्कार, हाय किंवा हॅलो असा संदेश पाठविल्यानंतर तुम्हाला, नमस्कार, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन २०२३ च्या चॅटबॉटवर तुमचे हार्दिक स्वागत आहे. कृपया खालील पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडा, असा लघुसंदेश येईल

. त्यात खाली दिलेला पर्याय निवडल्यानंतर साहित्य संमेलनाशी निगडित प्रश्नांची यादी दिसेल. त्यापैकी कोणताही प्रश्न निवडल्यास त्याचे उत्तर तत्काळ तुमच्या भ्रमणध्वनी संचावर पाठविण्यात येईल. चॅटबॉटच्या माध्यमातून संमेलनाचे संकेतस्थळ, प्रतिनिधी व ग्रंथदालन नोंदणी, निवासव्यवस्था, भोजनातील पदार्थ, तसेच चार दिवसांत होणाऱ्या कार्यक्रमांची माहिती मिळणार आहे.

हेही वाचा…राष्ट्रीय युवा महोत्सव नियोजनात भाजप, शिंदे गट आघाडीवर, अजित पवार गट काहीसा अलिप्त

याशिवाय, संमेलनस्थळी कसे पोहोचावे, संपर्क कुणाशी करावा, याची माहिती व्हॉट्सअॅपवर मिळणार आहे. ज्यांना चॅटबॉटचा भ्रमणध्वनी क्रमांक माहीत नसेल, त्यांना लिंक किंवा व क्यूआर कोडच्या माध्यमातूनही चॅटबॉटचा वापर करता येणार आहे.