उन्हाळा नसतानाही जिल्ह्यात वाहनांना अचानक आग लागण्याच्या घटना घडत आहेत. मंगळवारी सकाळी सातच्या सुमारास सिन्नर-घोटी मार्गावर घोरवड घाटात मालवाहतूक वाहनाला अचानक आग लागली. या आगीत वाहन खाक झाले.मालवाहतूक वाहन घोटीहून सिन्नरकडे जात होते. घोरवड घाट परिसरात वाहनाने पेट घेतला. हा प्रकार चालकाच्या लक्षात येताच त्याने वाहनातून उडी घेतली.

हेही वाचा >>>जळगावातील रस्त्यांसाठी २०० कोटींचा निधी; मुंबईतील बैठकीत निर्णय

वाहनात प्लास्टिक पिशव्या आणि भंगार असल्याने आग लगेच फैलावली. काही कळण्याच्या आत वाहन खाक झाले. या घटनेची माहिती अग्निशमन विभागाला मिळाल्यावर सिन्नर नगरपरिषदेचा बंब घटनास्थळी दाखल झाला. अग्निनशमन कर्मचाऱ्यांनी आग नियंत्रणात आणेपर्यंत वाहनातील संपूर्ण माल बेचिराख झाला होता.मालवाहतूक वाहनाला लागलेल्या आगीमुळे परिसरात काही काळ वाहतूक कोंडी झाली. आगग्रस्त वाहन बाजूला करुन रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करण्यात आला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.