नाशिक – सांगली, भिवंडी, मुंबई येथील मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीत मैत्रीपूर्ण लढत होत असल्यास नाशिकच्या जागेवरही तशी लढत करावी, अशी मागणी उत्तर महाराष्ट्र कॉंग्रेस ओबीसी विभागाचे अध्यक्ष विजय राऊत यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे केली आहे.

हेही वाचा – अरुणाचल प्रदेशसह लक्षद्वीपमध्ये राष्ट्रवादीला घड्याळ चिन्ह मिळणार, राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांचा दावा

हेही वाचा – काँग्रेसशी मैत्री पुरे ! कोल्हापुरातील सेनेच्या दोन्ही खासदार, पालमंत्र्यांना भाजप कार्यकर्त्यांनी सुनावले

नाशिक हा कॉंग्रेसचा बालेकिल्ला असला तरी अनेक वर्षांपासून ही जागा कॉंग्रेस पक्ष लढलेला नाही. खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेला नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे अभूतपूर्व प्रतिसाद मिळाल्याने कॉंग्रेस कार्यकर्त्यांचे मनोबल वाढले असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे. कॉंग्रेसचे गो. ह. देशपांडे, यशवंतराव चव्हाण, मुरलीधर माने, प्रताप वाघ, वसंतराव पवार, माधवराव पाटील असे अनेक जण या मतदारसंघातून निवडून गेले आहेत. नाशिक लोकसभा मतदारसंघात कडवी झुंज देण्याची क्षमता असलेले उमेदवार पक्षात आहेत. परंतु, आतापर्यंत वरिष्ठ पातळीवर त्यांची दखल घेतली गेली नाही. त्यामुळे नाशिक लोकसभेची जागादेखील मैत्रीपूर्ण पद्धतीने लढवावी, त्यासाठी कॉंग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी नाशिक लोकसभेचा पुन्हा एकदा आढावा घ्यावा, अशी मागणी राऊत यांनी पटोले यांच्याकडे केली आहे.