नाशिक – अपहरण आणि खंडणी प्रकरणात सहा महिन्यांपासून फरार आरोपीस गुन्हे शोध पथकाने ताब्यात घेतले. त्याच्यावर इंदिरानगर, अंबड तसेच गंगापूर पोलीस ठाण्यात विविध गुन्हे दाखल आहेत. इंदिरानगर पोलीस ठाण्यात खंडणी, अपहरण प्रकरणात काही आरोपींचा शोध सुरू होता. वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाच्या वतीने आरोपींची शोध मोहीम राबविण्यात येत आहे.

अंमलदार अमोल कोथमिरे यांना एका गुन्ह्यातील आकाश वानखेडे (३१, रा. पाथर्डी गाव) हा जिल्हा रुग्णालयात मित्रांना भेटण्यासाटी येत असल्याची माहिती मिळाली. त्याच्यावरील गुन्हे गंभीर स्वरूपाचे असल्याने पोलिसांनी सापळा रचत आकाश यास जिल्हा रुग्णालयाच्या आवारातून ताब्यात घेतले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आकाश हा गुन्हा घडल्यापासून स्वत:चे अस्तित्व लपवून राहत होता. तसेच वारंवार वास्तव्याचे ठिकाण बदलत असल्याने पोलिसांना गुंगारा देत राहिला. मात्र इंदिरानगर पोलिसांनी शिताफीने सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. शहर परिसरातील वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये त्याच्यावर १० गुन्हे दाखल आहेत.