नाशिक – पंढरपूर येथे आषाढी यात्राेत्सवासाठी जाणाऱ्यांची गर्दी पाहता राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक विभागातर्फे दोन ते ११ जुलै या कालावधीत ३०० जादा बससेवेचे नियोजन करण्यात आले आहे.

पंढरपूर येथे दोन ते ११ जुलै या कालावधीत आषाढी एकादशीनिमित्त यात्रोत्सव होणार आहे. पंढरपूरमध्ये राज्याच्या कानाकोपऱ्यातून मानाच्या दिंड्या विठुरायाच्या दर्शनासाठी दाखल होतात. उत्सव काळात भाविकांसह वारकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. सहा जुलै रोजी आषाढी एकादशी तसेच १० जुलै रोजी गुरूपौर्णिमा आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या अनुषंगाने पंढरपूर येथे जाण्यासाठी नाशिक विभागातून ३०० जादा बससेवेचे नियोजन करण्यात आले आहे. नाशिक आगार क्रमांक एकमधून अहिल्यानगर, करमाळामार्गे, मालेगावातून शिर्डी, अहिल्यानगरमार्गे, सटाण्याहून मनमाड, अहिल्यानगरमार्गे तसेच देवळा, मनमाडमार्गे, कळवणमधून मनमाडमार्गे, मनमाडहून अहिल्यानगरमार्गे तसेच चांदवडमार्गे, येवल्याहून अहिल्यानगरमार्गे, लासलगांवहून कोळपेवाडी, शिर्डीमार्गे, पिंपळगावहून नाशिक, अहिल्यानगरमार्गे, नांदगावहून येवलामार्गे, सिन्नरहून अहिल्यानगरमार्गे, इगतपुरीहून नाशिकमार्गे, पेठहून नाशिकमार्गे, याप्रमाणे बससेवा राहणार आहे. प्रवाशांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन महामंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.