मोदीनगर येथे सुरू असलेल्या दुसऱ्या राष्ट्रीय खेलो इंडिया महिला वेटलिफ्टिंग मानांकन स्पर्धेत मनमाड येथील आंतरराष्ट्रीय खेळाडू आकांक्षा व्यवहारे ला तीन नवीन राष्ट्रीय विक्रमासह सुवर्णपदक मिळाले. शुक्रवारपासून सुरू झालेल्या महिला स्पर्धेत ४० किलो वजनी गटात आपल्या उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करीत स्नॅच मध्ये ६० किलो वजन उचलून स्वतःचाच ५९ किलो चा विक्रम मोडीत काढत आकांक्षा ने नवीन राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला.

हेही वाचा >>>जळगाव : शिंदे यांचीच शिवसेना खरी ; गिरीश महाजनांचा दावा; उद्धव ठाकरेंवर घणाघात

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

तसेच क्लिन जर्क मध्ये ७१ किलो वजन उचलून पुन्हा एकदा स्वतःचाच ७० किलोचा राष्ट्रीय विक्रम मोडीत काढत नवीन राष्ट्रीय विक्रमासह एकूण १३१ किलो चा नवीन राष्ट्रीय विक्रम स्थापित करून तीन नवीन राष्ट्रीय विक्रमासह सुवर्णपदक व रोख दहा हजार रुपयांचे पारितोषिक पटकावून महाराष्ट्रासाठी विजयी सुरवात केली आहे.आकांक्षा ला छत्रे विद्यालयाचे क्रीडा प्रशिक्षक प्रवीण व्यवहारे व आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक तृप्ती पाराशर यांचे मार्गदर्शन लाभले आहे.