यापुढे खानदेश नव्हे; तर कान्हादेश म्हणायला हवे. जळगाव भागात मोठ्या प्रमाणात वाढलेली गोतस्करी, गोहत्या आणि गोरक्षकांवरील आक्रमण रोखण्यासाठी पोलीस प्रशासन सक्षमपणे कधी लक्ष देईल, टिपू सुलतान आणि औरंगजेब यांचे उदात्तीकरण का केले जात आहे, असे प्रश्न हिंदू जनजागृती समितीतर्फे शहरातील शिवतीर्थ मैदानावर आयोजित हिंदू राष्ट्र-जागृती सभेत करण्यात आले. छत्रपतींचा जाज्वल्य इतिहास आणि स्वाभिमान समोर ठेवून जीवन जगा, भारतात राहून पाकिस्तानचे गोडवे गाणार्‍या अभिनेत्याच्या पठाण चित्रपटावर बहिष्कार घाला, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.

हेही वाचा >>>नाशिक : जिल्हा बँकेच्या कारवाईविरोधात कायदेशीर लढा ; शेतकरी संघटना समन्वय समितीचा सोमवारी मेळावा

सभेत सुरेश चव्हाणके यांच्यासह सनातन संस्थेचे धर्मप्रचारक नंदकुमार जाधव, हिंदू जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक सुनील घनवट, रणरागिणी शाखेच्या रागेश्री देशपांडे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी अमोल वानखेडे यांनी शंखनाद केला. सनातन प्रकाशित सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांची समष्टी साधना व आध्यात्मिक अधिकार या ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले. जिल्हा समन्वयक प्रशांत जुवेकर यांनी हिंदू जनजागृती समितीच्या कार्याचा आढावा मांडला. सतीश कोचरेकर यांनी सूत्रसंचालन केले.

घनवट यांनी देशाला इस्लामी राष्ट्र, खलिस्तानी राष्ट्र, ख्रिस्ती आणि धर्मनिरपेक्ष राष्ट्र होऊ द्यायचे नसल्यास आतापासून हिंदू राष्ट्रासाठी कार्य करण्यास आरंभ करा, असे आवाहन केले. सध्या अल्पसंख्याकांचे तुष्टीकरण चालू आहे. जळगाव जिल्ह्यातील सावदा, फैजपूर, यावल परिसरात सर्रासपणे गोतस्करी, गोहत्या होत आहेत. जळगावमध्ये अवैधपणे पशुवधगृहे सुरू आहेत. हे सर्व थांबवायचे असल्यास गावागावांत याविषयी आंदोलने व्हायला हवीत. वक्फ बोर्डाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील चोपडा, नाशिक जिल्ह्यातील निफाड यांसह अनेक ठिकाणी वक्फ बोर्डाने जमिनींवर दावा केला असल्याचेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा >>>नाशिकचे रखडलेले प्रकल्प लवकरच मार्गी ; चंद्रशेखर बावनकुळे यांचे ” होमेथॉन ” मध्ये आश्वासन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

जाधव यांनी विदेशात हिंदू धर्म, योग, आयुर्वेद यांविषयी मोठ्या प्रमाणात आकर्षण निर्माण होत असताना भारतीय स्वत:ची वेशभूषा, केशभूषा, आहार, संस्कृती, परंपरा विसरत चालले असल्याचे सांगितले. धर्मपालन करणे आज हिंदूंना हास्यास्पद वाटत असल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली.
रागेश्री देशपांडे यांनी जिहादी संकट रोखण्यासाठी हिंदू मुलींनी धर्माचरण करणे आवश्यक असल्याचा सल्ला दिला. सभास्थळी क्रांतिकारकांची यशोगाथा आणि धर्माचरण यांचे महत्त्व विशद करण्यासाठी बालचमूंनी क्रांतिकारक आणि पारंपरिक वेशभूषा परिधान केलेला बालसंस्कार कक्ष उभारला होता. याद्वारे नागरिकांचे प्रबोधन करण्यात येत होते. धरणगाव येथील गायरान बचाव मंचने गायरान जमिनीवरील अतिक्रमित थडगे पाडण्यासाठी सात वर्षे अखंडपणे शासनाचा पाठपुरावा केला आणि अखेर प्रशासनास ते पाडण्यास भाग पाडले. गायरान बचाव मंचच्या पदाधिकार्‍यांचा सुरेश चव्हाणके यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सभास्थळी हिंदू राष्ट्र आणि धर्म या विषयांवरील ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने, तसेच क्रांतिकारक आणि धर्माचरण कसे करावे, यांचे फलक प्रदर्शन लावण्यात आले होते.