सीमावर्ती भागातील बांधव गुजरात आणि कर्नाटकात जाण्याचे मत मांडत असल्याच्या प्रकरणात राज्य सरकारवर आरोप करण्यापेक्षा सरकारला थोडा वेळ द्या, शिंदे-फडणवीस सरकार सक्षम असून या दोन्ही नेत्यांनी या प्रकरणाची दखल घेतली आहे. त्यामुळे सरकारला थोडा वेळ दिल्यास जे बांधव इतर राज्यात जाण्याचे म्हणत आहेत, त्यांच्या परिस्थितीत बदल होईल, असा विश्वास भाजपा महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी व्यक्त केला आहे.

हेही वाचा- पुणे – नाशिक हायस्पीड रेल्वे प्रकल्प केंद्रीय मंत्रिमंडळाच्या मंजुरीच्या प्रतीक्षेत; महारेल रेल्वेमंत्र्यांकडे भूमिका स्पष्ट करणार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संघटनात्मक बांधणीनिमित्त नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर आलेल्या वाघ यांनी विविध प्रश्नांविषयी पत्रकारांशी संवाद साधला. संजय राऊत सर्वज्ञानी आहेत. ते काहीही बोलू शकतात, आमचे नाव घेत आमची नक्कल करुन त्यांचे दुकान चालत असेल तर, आमच्या शुभेच्छा. पण आपल्या सरकारने मागील अडीच वर्षात काय दिवे लावले, यावर बोलले तर बर होईल, असा टोमणा वाघ यांनी ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारेना लगावला. औरंगाबादेतील ओझर यथे महिलेस विवस्त्र करुन मारझोडप्रकरणी आपण पोलीस अधिक्षकांशी बोललो असल्याचेही त्यांनी सांगितले. सोलापूर येथे एकाच युवकाशी जुळ्यांच्या विवाहामुळे चुकीचे पायंडे पडतात की काय, अशी भीती वाटत आहे. अशा घटना चुकीच्या आहेत, असे मतही वाघ यांनी मांडले.