नाशिकमध्ये एका दुर्देवी अपघातात चार तरुण जागीच ठार झाल्याची घटना समोर आलीय. येवला रोडवरील अनकवाडे शिवारात कार झाडावर आदळून झालेल्या भीषण अपघातात चार तरुण जागीच ठार झाले. गाडीने प्रवास करणाऱ्या पाच जणांपैकी एकजण गंभीर जखमी झाला आहे.
मध्यरात्रीच्या सुमारास हा अपघात झाला. अपघात इतका भीषण होता की कार अक्षरशः चक्काचुर झाली आहे. अपघातात तौफिक शेख, दिनेश भालेराव, प्रवीण सकट, गोकुळ हिरे चौघे जागीच ठार झाले आहेत. तर गाडीमधील पाचवा प्रवासी असणारा अजय वानखेडे हा गंभीर जखमी झाला आहे. अजयवर मनमाडच्या उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार आहेत.
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
मात्र अजयची प्रकृती पाहून त्याला सकाळच्या सुमारास पुढील उपचारासाठी नाशिकला हलविण्यात आल्याची माहिती स्थानिक प्रशासनाने दिली आहे. हा अपघात नेमका कसा झाला याचा तपास पोलीस करत आहेत.

