जळगाव – यावल तालुक्यातील अट्रावल येथे शनिवारी झालेल्या दंगलप्रकरणी वेगवेगळ्या तक्रारींवरून २०५ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यांपैकी ॲट्रॉसिटीविरोधी कायद्यान्वये नऊ तसेच इतर गुन्ह्यांतील आठ, अशा १७ संशयितांना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे. अट्रावल येथे शनिवारी सकाळी दंगल झाली होती.

हेही वाचा >>> नाशिक : जिल्हा परिषदेचे कामकाज कागदविरहित होण्याच्या दिशेने पाऊल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यासंदर्भात यावल येथील पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गटांकडून तक्रारी दाखल करण्यात आल्यावर गुन्हे दाखल झाले. त्यात विजय कोळी यांच्या तक्रारीवरून ५७ ज्ञात आणि २५ अज्ञात संशयितांविरुद्ध दंगलीसह विविध कलमांनुसार गुन्हा दाखल झाला. दिवाकर तायडे यांच्या तक्रारीवरुन ५१ आणि इतर २५ अज्ञात संशयितांविरुद्ध अॅट्रॉसिटीविरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला. यापैकी ॲट्रॉसिटी विरोधी गुन्ह्यातील नऊ संशयितांना भुसावळ न्यायालयाने सहा एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.