प्रशासनाच्या शुल्क नाक्याला ठेंगा

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नाशिक : करोना रुग्णांची वाढती संख्या आणि बाजारपेठेतील गर्दी यावर नियंत्रण मिळविण्यासाठी नाशिक पोलीस आणि महानगरपालिका यांच्या संकल्पनेतून बाजारपेठेत जाणाऱ्यांसाठी पाच रुपये शुल्क आकारण्यास सोमवारपासून सुरुवात झाली. यासाठी संबंधित यंत्रणेकडून बाजारपेठांमध्ये जाणाऱ्या रस्त्यांवर नियोजनही करण्यात आले. परंतु दुसऱ्याच दिवशी मंगळवारी या नियोजनाचा फज्जा उडाला. महापालिके च्या कर्मचारी-पोलिसांची पर्वा न करता ग्राहक थेट बाजारपेठेत घुसखोरी करताना दिसून आले.

करोना रुग्णसंख्येने शहर परिसरात एक लाखाचा टप्पा पार के ला असून दिवसागणिक हजाराहून अधिक रुग्णांची भर पडत आहे.

संसर्गाची साखळी खंडित व्हावी यासाठी प्रशासनाकडून टाळेबंदीचा इशारा दिला जात असला तरी नागरिकांच्या बाजारपेठेतील वर्दळीवर कोणताही परिणाम झालेला नाही.

पोलीस आयुक्त दीपक पाण्डेये यांच्या संकल्पनेतून सोमवारपासून शहरातील मुख्य बाजारपेठ, भाजीबाजार परिसरात विनाकारण भटकणाऱ्यांवर निर्बंध आणताना नागरिकांनी एक तासासाठी पाच रुपयांची पावती फाडावी, एक तासापेक्षा जास्त वेळ लागला तर ५०० रुपये दंड आकारण्याची व्यवस्था करण्यात आली.

पहिल्याच दिवशी महापालिका आणि पोलीस यांच्याकडून कार्यवाहीला सुरुवात झाली. परंतु या व्यवस्थेवर दुसऱ्याच दिवशी मंगळवारी पाणी फिरले. मेन रोड परिसरात विनाकारण जाणाऱ्यांना अटकाव करण्यासाठी नामको

बँक, धुमाळ पॉइंट  आणि दामोदर टॉकीज या ठिकाणी महापालिके च्या अधिकाऱ्यांनी पाच रुपये शुल्क आकारणीसाठी नाका के ला. परंतु पोलीस नसल्याने नागरिकांनी महापालिके च्या कर्मचाऱ्यांकडे पावती न फाडता थेट पुढे जाणे पसंत के ले. काही जणांनी प्रशासनाचे हे नाके  टाळत गल्ली-बोळातून वाट काढत बाजारपेठ गाठली.

पोलीस असले तरच नागरिक स्वत:हून पावती फाडतात. आम्ही प्रयत्न के ला तर वाद घालतात, असे महापालिका कर्मचाऱ्यांनी सांगितले. दुसरीकडे, पंचवटी येथील बाजार समितीत जाण्यासाठीही पाच रुपये शुल्क घेण्यास सुरुवात झाली. परंतु या ठिकाणी पहाटे लिलावाच्या वेळी तसेच सायंकाळीच गर्दी होते. याउलट महापालिके चे कर्मचारी कार्यालयीन वेळेत त्या ठिकाणी येतात.

इतर वेळी नागरिकांची मनमानी सुरू राहते. सर्वत्र सावळागोंधळ असताना पवननगर येथील भाजीबाजार परिसरात मात्र नियमाप्रमाणे काम सुरू होते. भाजीबाजार संकु ल परिसराकडे येणारे मुख्य रस्ते बंद करत प्रवेश तसेच बाहेर हे दोन रस्ते खुले ठेवण्यात आले. नागरिकांकडूनही प्रशासनाला सहकार्य करण्यात आले.

मंगळवारी महात्मा गांधी रोड परिसर, शिवाजी चौकसह अन्य भागातील मुख्य बाजारपेठेत नियोजनासाठी महापालिके चे विभागीय अधिकारी तसेच पोलीस अधिकारी, कर्मचारी यांनी पाहणी के ली.

ऑनलाइन पास काढता येणार

बाजारपेठेत प्रवेशासाठी पास काढण्यात बराच कालापव्यय होतो. तो टाळण्यासाठी घरबसल्या ऑनलाइन पास काढण्यासाठी खास अ‍ॅपची निर्मिती केली जात असल्याचे पालिका आयुक्त कैलास जाधव यांनी सांगितले. या अ‍ॅप वा लिंकच्या माध्यमातून बाजारात जाण्याची वेळ निश्चित करता येईल. लसीकरणाची गती वाढविण्यासाठी २५ खासगी रुग्णालयात लसीकरण केंद्रांना मान्यता देण्यात आली आहे. खाटा मिळण्याबाबतच्या मध्यवर्ती ऑनलाइन व्यवस्थेत काही त्रुटी आहेत. त्यात माहिती समाविष्ट करण्यात कालापव्यय होत असल्याने रिक्त दिसणाऱ्या खाटा प्रत्यक्षात तसे नसते. या व्यवस्थेत बदल केले जाणार असल्याचे जाधव यांनी सांगितले.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Consumers enter into the market ignoring municipal staff and police zws
First published on: 31-03-2021 at 00:03 IST