लोकसत्ता प्रतिनिधी

नाशिक – कौटुंबिक वादातून रागाच्या भरात पती-पत्नीने आत्महत्या केली. या प्रकरणी चांदवड पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चांदवड तालुक्यातील परसूल शिवार परिसरात बरकले कुटूंबीय राहतात. भाऊसाहेब बरकले (३७) आणि त्यांची पत्नी सुनिता यांच्यात काही वाद सुरू होते. याच वादातून भाऊसाहेब यांनी घरात गळफास घेतला. तर, सुनीता यांनी विषप्राशन करुन आत्महत्या केली. भाऊसाहेब यांच्या पश्चात आई, सात वर्षाची मुलगी असा परिवार आहे.