शहराचे सांस्कृतिक वैभव असलेल्या महाकवी कालिदास कलामंदिराच्या प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी येथील अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखेच्या वतीने पालकमंत्री दादा भुसे यांना साकडे घालण्यात आले. दुरुस्तीनंतर २०१९ मध्ये कलामंदिर सुरू झाल्यानंतर आयुक्त, स्थायी समिती अध्यक्ष आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष यांच्यात झालेल्या चर्चेनुसार ५०० रुपयांपर्यंत तिकीट दर असलेल्या नाटकांसाठी वेगळे आणि ५०० रुपयापुढे दर असलेल्या नाटकांसाठी वेगळे दर निश्चित झाले होते.

हेही वाचा >>> नाशिक : रस्त्यांच्या अवस्थेकडे लक्ष वेधण्यासाठी जळगावात मनसेचे आंदोलन

परंतु, नियमावलीत केलेल्या शब्दरचनेमुळे फक्त चार रांगापर्यंत रुपये ४९९ तिकीट असलेल्या नाटकांसाठी वेगळा दर असा अर्थ निघत आहे. राज्यात इतरत्र कुठेही असा नियम नाही. मध्यंतरी प्रशासनाने कोणालाही न विचारता सत्राची वेळ बदलली. त्यानंतर काही अपरिहार्य कारणास्तव नाटक सुटण्यास नियोजित वेळेपेक्षा थोडा विलंब झालेल्या प्रयोगांची अनामत रक्कम अजूनही देण्यात आलेली नाही. त्यामुळे नाट्यसंस्थांची नाराजी आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पूर्वीची वेळ पूर्ववत ठेवण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. कलामंदिराचे तिमाही आरक्षण करतांना प्रत्येक तारखेस होणारा नाट्यप्रयोग निश्चित नसतो. ठरलेला प्रयोग चार ते सहा दिवसांपूर्वी रद्द होतो. त्याऐवजी दुसरा सांस्कृतिक कार्यक्रम ठरवावा लागतो. यामुळे कार्यक्रमाचा वर्ग बदलण्याची शक्यता आहे. करोनानंतर कालिदास कला मंदिरातील उपहारगृह अद्याप सुरू झालेले नाही. ते लवकरात लवकर सुरू करण्याची मागणीही करण्यात आली आहे.