धुळे : देयक वाढवून देण्यासाठी धुळे जिल्हा कोषागार कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या नावाने दोन हजार रुपयांची लाच स्वीकारताना पोलीस अधीक्षक कार्यालयातील लिपिकाला रंगेहात पकडण्यात आले. लाचलूचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली.

धुळे पोलीस दलातून सहायक उपनिरीक्षक या पदावरून २०१९ मध्ये सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्याने त्याची राहिलेली देयके मंजूर व्हावीत म्हणून १० जुलै रोजी पोलीस अधीक्षक कार्यालयात अर्ज केला होता. या रकमेपैकी एक लाख, २९ हजार ८८८ रुपयांचे देयक त्यांच्या बँक खात्यात जमा झाले होते. यानंतर त्यांनी उर्वरित देयकाची रक्कमही मिळावी म्हणून धुळे पोलीस अधीक्षक कार्यालयातील लेखा शाखेतील वरिष्ठ लिपीक सुनील गावित (४८) याची भेट घेतली. चौकशी केली असता दिलेल्या देयकाच्या मोबदल्यात आणि थकीत देयक वाढवून देण्याचे काम करून देण्यासाठी कोषागार कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या नावाने दोन हजार रुपयांची मागणी गावितने केली.

As the son took over the house old lady complaint to the Divisional Commissioner directly
मुलाने घर हिसकावून घेतले, आता कुठे जाणार? वृद्ध महिला पोहचली थेट विभागीय आयुक्तांकडे
8th September Rashi Bhavishya & Marathi Panchang
८ सप्टेंबर पंचाग: मेष, कुंभसह ‘या’ पाच राशींच नशीब बदलणार इंद्र योग; सुखाच्या सरी बरसणार तर कोणाचे कष्ट वाढणार; वाचा तुमचे भविष्य
After Hinjewadi IT Park and Chakan MIDC now which company will move out
शहरबात : सावध ऐका, पुढच्या हाका! हिंजवडी आयटी पार्क, चाकण एमआयडीसीनंतर आता कोण…
constable commits suicide marathi news
पुणे: महिला पोलीस शिपायाची इंद्रायणी नदीत उडी; तरुणाने वाचवण्याचा प्रयत्न केला पण…
Nitin Gadkari, Wardha, Raksha Bandhan, charity, Smita Kolhe Ties Rakhi to nitin gadkari
बहिणीने राखी बांधली; पण मंत्री असलेल्या भावाकडे ओवाळणीसाठी पैसेच नव्हते, मग…
anganwadi worker cross the flooded river video goes viral
Video : पूर आलेली नदी ओलांडण्यासाठी अंगणवाडी सेविकेने काय केले?
Vasai, bhayandar railway station suicide, father and son suicide, Jai Mehta, dual marriage, Bhayandar railway station, southern girl
वसई : पिता पुत्राचे रेल्वे रूळावरील आत्महत्येचे गूढ उकलले; मुलाचे प्रेमसंबंध उघड
UPSC Success Story: From Egg Seller To Civil Servant, Bihar Man's Inspiring Journey To UPSC Success Who Now Also Gives Free IAS Coaching
UPSC Success Story: कष्टाचे फळ मिळालेच! परिस्थितीवर मात करत पठ्ठ्या कसा झाला आयएएस अधिकारी वाचा

हेही वाचा : Nashik Crime : नाशिकमध्ये दुचाकीवर बसलेल्या तरुणाची हत्या, थरार सीसीटीव्हीत कैद

यासंदर्भात सेवानिवृत्त सहायक पोलीस उपनिरीक्षकाने दोन हजाराची मागणी केल्यासंदर्भात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांकडे तक्रार केली. या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे पोलीस अधीक्षक कार्यालयात सापळा रचण्यात आला. लाचेची रक्कम स्वीकारताच सुनील गावित यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. गावितविरुद्ध धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सचिन साळुंखे, रूपाली खांडवी, राजन कदम, संतोष पावरा यांनी ही कारवाई केली.

हेही वाचा : कसारा घाटात रेल्वे मार्गावर दरड कोसळली, नाशिक-मुंबई वाहतूक सुरळीत

कोणताही शासकीय अधिकारी, कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने कोणत्याही खासगी व्यक्तीने त्यांचे कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी, किंवा न करण्यासाठी अथवा ते काम करून दिल्याचे मोबदल्यात लाचेची मागणी केल्यास तत्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभाग,नाशिक येथे संपर्क करावा. असे आवाहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी केले.