नाशिक – शहरात ११९८ धोकादायक वाडे व घरे असून पावसाळ्यात काझीगढी परिसरात दरड कोसळण्याची शक्यता असते. असे वाडे, घरे आणि काझी गढी परिसरातील रहिवाशांना सुरक्षित स्थळी स्थलांतरीत करण्यासाठी नोटीस बजावली गेली आहे. संभाव्य दुर्घटना टाळण्यासाठी धोकादायक क्षेत्रातील वाडे, घरे पोलिसांच्या मदतीने रिकामे करण्याची तयारी करण्यात आली आहे. नाशिकसह मालेगाव महानगरपालिका आणि नगरपंचायत क्षेत्रातील धोकादायक वाडे, इमारती व पुलांचे संरचनात्मक लेखापरीक्षण करण्याचे निर्देश जिल्हा आपत्ती प्राधिकरणने  स्थानिक यंत्रणेला दिले आहेत.

हेही वाचा >>> नाशिक : देवनदी बंधाऱ्यात बुडून दहावीतील दोन मुलांचा मृत्यू

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मान्सून काळातील भूस्खलन, पूर अशा संभाव्य आपत्तीच्या दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासकीय पातळीवर तयारी सुरू झाली आहे. पावसाळ्यात अनेकदा जुन्या वाड्यांची पडझड होते. यात जिवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही, नाशिक शहरात ११९८ धोकादायक वाडे, इमारती, घरे आहेत. यात नाशिक पश्चिम विभागात ५२७, सातपूर ६१, काझीगढी भागात १५२, नाशिक पूर्व विभागात १२२, नवीन नाशिक ७१, पंचवटी २०३ आणि नाशिकरोड विभागातील ६२ वाडे, घरांचा समावेश आहे. धोकादायक वाडे व घरातील रहिवाशांना ते रिकामे करण्याबाबत नोटीस बजावली गेली. वेळ पडल्यास पोलिसांच्या मदतीने ती रिक्त करण्याचा इशारा देण्यात आल्याची माहिती मनपाने आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला दिली. जुन्या नाशिकमध्ये गोदा काठावरील काझी कढीचा भाग धोकादायक क्षेत्रात समाविष्ट होतो. पावसाळ्यात नागरिकांना सुरक्षितस्थळी स्थलांतरीत करण्यासाठी नियोजन करण्यास सांगण्यात आले आहे. शहरातील जुने वाडे, इमारती, पूल यांचे तातडीने संरचनात्मक लेखापरीक्षण करण्याची सूचना प्राधिकरणाने स्थानिक यंत्रणेला केली आहे.