लोकसत्ता प्रतिनिधी

नाशिक : सिन्नर शहरापासून जवळच असलेल्या कुंदेवाडीजवळील देवनदी बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेलेल्या इयत्ता दहावीतील दोन मुलांचा बुडून मृत्यू झाला. सिन्नरमधील आंबेडकर नगरचे दोघे रहिवासी आहेत. गुरूवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास ही घटना घडली.

आणखी वाचा-नाशिक विभागात १५ लाख नागरिकांची टँकरवर भिस्त; ३१६१ गाव-वाड्यांना ७७८ टँकरने पाणी, ४५१ विहिरी अधिग्रहित

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सार्थक जाधव आणि अमित जाधव हे दोघे मित्रांसह कुंदेवाडी येथील देवनदीवरील बंधाऱ्यात पोहण्यासाठी गेले होते. पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही बुडाले. सोबतच्या मित्रांनी आरडाओरड केल्यावर मदतीसाठी परिसरातील नागरिक धावले. पोलिसांना घटनेची माहिती मिळाल्यानंतर निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्यासह कर्मचाऱ्यांनी मदतकार्य सुरु केले. दोघांचे मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आले. अमित आणि सार्थक या दोघांनी इयत्ता १० वीची परीक्षा दिली होती. प्रवीण जाधव, लखन खरताळे, राम जाधव, अमोल जाधव, रोहन भावसार, शरद जाधव, नवनाथ बर्डे आदी तरुणांनी मदतकार्य केले.