इगतपुरी तालुक्यातील भाम धरणाजवळ नदीपात्रात शुक्रवारी आंघोळीसाठी गेलेली ३८ वर्षाची व्यक्ती पाण्यात बुडाली. दोन तासाहून अधिक काळ शोधाशोध करूनही त्याचा पत्ता लागला नाही. याबाबत स्थानिक प्रशासनाकडून त्वरीत कार्यवाही केली नसल्याची नातेवाईकांची तक्रार आहे.इगतपुरी तालुक्यातील निरपण गावातील शरद पोकळे हा युवक भाम नदीपात्रात आंघोळीसाठी उतरला. परंतु, तो बुडाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दोन तासांहून अधिक काळ झाला तरी तो कुठे दिसला नाही. शरद याचा शोध लागत नसल्याने प्रशासनाला, पोलिसांना माहिती देण्यात आली. परंतु, संबंधित विभागाकडून त्वरीत कार्यवाही करण्यात आली नसल्याची नातेवाईकांची तक्रार आहे. दरम्यान, परिसरातील मच्छिमारांच्या मदतीने पाच तासाच्या अथक प्रयत्नानंतर त्याचा मृतदेह सापडला. सायंकाळी उशीराने हा मृतदेह इगतपुरी रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आला

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Drowned youth searching in bham river igatpuri nashik tmb 01
First published on: 07-10-2022 at 17:17 IST