जळगाव : शिवसेनेच्या फुटीनंतर मुंबईत बुधवारी उद्धव ठाकरे गट आणि एकनाथ शिंदे गट यांचा स्वतंत्र दसरा मेळावा होत आहे. जिल्ह्यातून शिंदे गटाच्या मेळाव्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या २३० बसगाड्यांची नोंदणी करण्यात आल्याचे विभाग नियंत्रक भगवान जगनोर यांनी सांगितले.मेळाव्याव्दारे शक्तिप्रदर्शनासाठी दोन्ही गटांकडून प्रयत्न केले जात आहेत. ठाकरे गटाच्या मेळाव्याला जिल्ह्यातून १० हजारांपेक्षा अधिक कार्यकर्ते व पदाधिकारी जाणार असल्याचे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे यांनी सांगितले. शिंदे गटाच्या मेळाव्याला २० हजारांपेक्षा अधिक कार्यकर्ते व पदाधिकारी जाणार असल्याची माहिती आमदार किशोर पाटील यांनी दिली.

मुंबईतील मेळाव्यांसाठी मंगळवारी दुपारनंतर कार्यकर्त्यांना घेऊन मुंबईकडे बस रवाना होऊ लागल्या. राज्यभरातील कार्यकर्ते व पदाधिकार्‍यांना मुंबईत येण्यासाठी महामंडळाच्या सुमारे चार हजार बसची नोंदणी करण्यात आली आहे. मुंबईतील महामंडळाच्या मध्यवर्ती कार्यालयाकडून या बसची नोंदणी झाली आहे. बसचे एकत्रित भाडेही मध्यवर्ती कार्यालयात जमा करण्यात आले आहे. मध्यवर्ती कार्यालयाकडून शिंदे गटाच्या जळगाव जिल्ह्यातील आमदारांच्या कार्यकर्त्यांसाठी २३० बस पुरविण्याचे आदेश दिले आहेत. यात पाचोरा-भडगाव, पारोळा-एरंडोल, चोपड्यासाठी बस पाठविण्यात येणार आहेत. मुंबईतील मेळावा झाल्यानंतर लगेच बस रात्री जळगावकडे परतणार असल्याचे महामंडळाच्या सूत्रांनी सांगितले.

Yavatmal Lok Sabha seat, mahayuti, lok sabha 2024, maha vikas aghadi, Candidate, Lack of Local, Performance Record, wrath of citizens, yavatmal politics news, washim politics news, washim news,
लोकसभेच्या रिंगणात उमेदवारांची उणीदुणी; जनतेचे मनोरंजन! उमेदवारांनी विकासावर बोलण्याची मतदारांची अपेक्षा
male candidates Kalyan
कल्याण लोकसभेत ‘ईडी’ची पीडा टाळण्यासाठी ठाकरे गटाच्या पुरुष उमेदवारांची माघार?
The seat sharing dispute in the Grand Alliance ends in two days
महायुतीमधील जागावाटपाचा तिढा दोन दिवसांत सुटेल; ३ मित्रपक्ष युतीधर्म पाळत नसल्याबद्दल शिंदे गटात नाराजी
Mayawati Chandrashekhar Aazad
मायावतींची नवी खेळी; चंद्रशेखर आझाद यांना टक्कर देण्यासाठी पुतण्या रिंगणात

हेही वाचा : नंदुरबारमध्ये पोलिसांकडून ८ लाखांची गांजा शेती उध्वस्त

मेळाव्यासाठी पाचोरा-भडगाव मतदारसंघातून शिंदे गटाचे १० हजार कार्यकर्ते जाणार आहेत. महामंडळाच्या बस, खाजगी मोटारींतून कार्यकर्ते रवाना होणार आहेत. काही रेल्वेतून जाणार असल्याचे आमदार किशोर पाटील यांनी सांगितले. जिल्ह्यातील ठाकरे गटाचे १० हजारांहून अधिक कार्यकर्त मेळाव्यात सहभागी होणार आहेत. मुंबईकडे पाच आक्टोबर रोजी जाणार्या रेल्वे गाड्यांमधील काही डबे आणि जागांसाठी नोंदणी करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाप्रमुख विष्णू भंगाळे यांनी दिली.