जिल्ह्यातील भुसावळ परिसरास शुक्रवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास भूकंपाचे हादरे बसले. या हादऱ्यांमुळे नागरिकांमध्ये काही वेळ घबराट पसरली.

हेही वाचा – पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय कडनोर यांना राष्ट्रपती पोलीस पदक

हेही वाचा – त्रिकूट दुर्घटनेत बचाव मोहिमेचे नेतृत्व करणारे ग्रुप कॅप्टन योगेश्वर कांदळकर यांना शौर्यचक्र

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भुसावळसह सावदा परिसराला भूकंपाचे हादरे बसले. नाशिक येथील भूकंपमापन केंद्रात सकाळी १०.३५ वाजता हे हादरे बसल्याची नोंद झाली असून त्यांची तीव्रता ३.३ रिश्टर स्केल इतकी असल्याची माहिती केंद्राच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे. भुसावळ शहरातील काही नागरिकांनी साडेदहाच्या सुमारास घरांना हादरे बसल्याची, तसेच काहीतरी मोठ्याने पडल्यावर जसा आवाज येतो, तसा आवाज आल्याचे सांगितले. काही इमारतींमधून नागरीक त्वरेने बाहेर पडल्याचेही सांगितले जाते. नागरिकांनी घाबरू नये, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.