मुंबईहून पारोळा येथे येत असताना अवघ्या तीन किलोमीटरवरील विचखेडा गावानजीक सोमवारी मोटार व गॅस टँकर यांच्यात झालेल्या धडकेत डॉक्टरासह पारोळा पालिकेच्या अभियंत्याचा जागीच मृत्यू झाला, तर एकजण जखमी झाला.पोलीस सूत्रांनी सांगितले की, मुंबई येथून पातोळ्या कडे येत असताना विचखेडा गावानजीक महामार्गावर सकाळी मोटार व ट्रँकर यांच्यात धडक झाली. समोरून येत असलेल्या भरधाव टँकरने मोटारीला जोरदार धडक दिली.

हेही वाचा >>>जळगाव: खानदेश नव्हे; तर कान्हादेश म्हणा – हिंदू राष्ट्र जागृती सभेत आवाहन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

त्यात पारोळा येथील पालिकेचा अभियंता कुणाल सौपुरे (वय ३५, रा. गोंधळवाडा, पारोळा) व डॉ. नीलेश मंगळे (वय ३५, रा. डी. डी.नगर, पारोळा) यांचा जागीच मृत्यू झाला, तर संदीप पवार (वय ३७) जखमी झाला आहे. याप्रकरणी पारोळा येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.कुणाल सौपुरे यांच्यामागे आई, भाऊ, पत्नी व दोन वर्षांची लहान मुलगी असा परिवार आहे. डॉ.नीलेश मंगळे हे उत्तराखंड येथे एमएस अर्थो स्पेशलिस्ट डॉक्टर म्हणून कार्यरत होते. त्यांच्यामागे आई, वडील, दोन भावंडे, पत्नी व दोन महिन्यांचे जुळे, असा परिवार आहे.