सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने ६१ व्या राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेची अंतिम फेरी एक ते २६ मार्च या कालावधीत येथील महाकवी कालिदास कलामंदिरात दुपारी चार ते सात, परशुराम साईखेडकर नाट्य मंदिरात रात्री आठ वाजता रंगणार आहे.मुंबई, पुणे, नगर, नाशिकसह अन्य भागातील ४० संस्था सादरीकरण करणार आहेत. महाकवी कालिदास कलामंदिरात काही नाटके सादर दुपारी चार वाजता होणार आहेत. यामध्ये एक मार्च रोजी देवगड येथील युथ फोरमचे निर्वासित, दोन रोजी पुणे येथील व्यक्ती संस्थेचे संगीत दहन आख्यान, चार रोजी दुपारी १२ वाजता सातारा येथील सूर्यरत्न युथ फाउंडेशनचे आपुलाची वाद आपणासी, सहा रोजी ठाणे येथील श्रीस्थानक बहुउद्देशीय संस्थेचे फ्लाईंग राणी, सात रोजी कोल्हापूर येथील श्रीजयस्तुते युवक मित्र मंडळाचे बॅलन्स शिट, आठ रोजी लातूर येथील शंकुतलादेवी सामाजिक सेवाभावी संस्थेचे अबीर गुलाल, नऊ रोजी जळगाव येथील समर्थ बहुउद्देशीय संस्थेचे अर्यमा उवाच, १३ रोजी दहिवली येथील नवक्रांती मित्र मंडळाचे युध्द अटळ आहे ?, १४ रोजी पुणे येथील नाट्य संस्कार कला अकादमीचे वार्ता वार्ता वाढे, १५ रोजी चंद्रपूर येथील मराठी बाणाचे वृंदावन, १६ रोजी नागपूर येथील गुलमोहर बहुउद्देशीय संस्थेचे अंधार उजाळण्यासाठी, २० रोजी बॉश फाईन आर्टसचे शीतयुध्द सदानंद, २१ रोजी नागपूर येथील बहुजन रंगभूमीचे गटार, २२ रोजी मुंबई येथील अश्वघोष आर्टस ॲण्ड कल्चर फोरमचे फक्त एकदा वळून बघ, २३ रोजी सोलापूर येथील आनंदरंग कलामंचचे रक्ताभिषेक, २४ रोजी अमरावती येथील अंबापेठ क्लबचे गांधी विरूध्द गांधी हे नाट्यप्रयोग सादर होणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>>“…हा हलकटपणा आहे”, शिंदे गटाच्या ‘त्या’ कृत्यावर संजय राऊतांची संतप्त प्रतिक्रिया

परशुराम साईखेडकर नाट्यमंदिरात दोन मार्च रोजी मालवण येथील स्वराध्या फाउंडेशनचे श्याम तुझी आवस इली रे, तीन रोजी महाड येथील सुहासिनी नाट्यधाराचे नात्यांचे गणित, पाच रोजी मुंबई येथील श्री विघ्नहर्ता प्रतिष्ठानचे मिशन व्हिक्टरी, फोंडा येथील श्री नागेश महालक्ष्मी प्रासादिक नाट्य समाजाचे एक रिकामी बाजू, आठ रोजी नाशिक येथील संवर्धन बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे चांदणी, नऊ रोजी सोलापूर येथील समर्पित फाउंडेशनचे तेरे मेरे सपने, १० रोजी उगवे येथील रसरंगचे इनफिल्ट्रेशन, ११ रोजी दुपारी १२ वाजता अहमदनगर येथील रंगकर्मी प्रतिष्ठानचे एका उत्तराची कहाणी, रात्री आठ वाजता कळंबोली येथील रामदास शेवाळे प्रतिष्ठानचे सखाराम बाईंडर, १२ रोजी दुपारी १२ वाजता मुंबई येथील बेस्ट कला व क्रीडा मंडळाचे ऱ्हासपर्व, रात्री आठ वाजता कोल्हापूर येथील परिवर्तन कला फाउंडेशनचे जंगल जंगल बटा चला है, १३ रोजी नाशिक येथील नाट्यसेवा थिएटर्सचे इश्क का परछा, १४ रोजी सांगली येथील नटराज फाउंडेशनचे शमा, १५ रोजी औरंगाबाद येथील लोकजागृती बहुउद्देशीय संस्थेचे अचानक, १६ रोजी परभणी येथील गोपाला फाउंडेशनचे दानव, १७ मार्च रोजी मुंबई येथील चारकोप कल्चरल ॲण्ड स्पोर्टस फाउंडेशनचे नात्याची गोष्ट, १८ रोजी बृहन्मुंबई पोलीस कल्याणचे इव्होल्युशन ए क्वेशनमार्क, २० रोजी औरंगाबाद येथील बजाज ऑटो कला व क्रीडा विभागाचे विसर्जनन, २१ रोजी अमरावती येथील अथ इति नाट्यकला प्रतिष्ठानचे समांतर, २२ रोजी पुणे येथील आनंदवन एज्युकेशन सोसायटीचे जातबोवारी, २३ रोजी कल्याण येथील आनंदी महिला संस्थेचे गुलाबची मस्तानी, २४ रोजी मालवण अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे बझर, २५ रोजी दुपारी १२ वाजता पिंपरी चिंचवड अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखेच्या वतीने मोक्षदाह, २६ रोजी रात्री आठ वाजता अहमदनगर जिल्हा हौशी नाट्य संघाचे म्हातारा पाऊस ही नाटके होणार आहेत.नाशिककरांनी स्पर्धेतील नाटकांचा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

More Stories onनाशिकNashik
Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Final round of state drama competition from tomorrow nashik amy
First published on: 27-02-2023 at 19:42 IST