सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने ६१ वी महाराष्ट्र राज्य अंतिम संस्कृत नाट्य स्पर्धा ३० ते दोन फेब्रुवारी या कालावधीत येथील परशुराम साईखेडकर नाट्य मंदिरात होणार आहे. अंतिम फेरीत १५ संघ सहभागी आहेत.
हेही वाचा – कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा जनस्थान पुरस्कार आशा बगे यांना जाहीर
हेही वाचा – आगामी कुंभमेळ्यासाठी पुरेसा निधी देणार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही
स्पर्धेत ३० जानेवारी रोजी सकाळी साडेनऊ वाजता वैदिक ज्ञान विज्ञान संस्कृत महाविद्यालयाचे ओरिगामी, नागपूर येथील संस्कृत भाषा प्रचारिणी सभेचे घटमिता बुध्दि:, नाशिक जिल्हा कर्मचारी पतसंस्था मर्यादितचे तथास्तु, ३१ रोजी दुपारी साडेबारा वाजता नाट्यसेवा थिएटर्सचे स्फोटनs भोकरवाडे:, ठाणे येथील सिमेन्स सांस्कृतिक संस्थेच्या वतीने सत्यं शोधं सुन्दरम्, एक फेब्रुवारी राेजी सकाळी नऊ वाजता नाशिक येथील मविप्र समाजाच्या वतीने सुलोचना, धुळे येथील लोकमंगला कलाविष्कार सहकारी संस्थेचे कथा अन्वेशणस्य, नागपूर येथील गुलमोहोर बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने तमोनैबद्ध्यम्, मुंबई येथील अमृत नाट्यवलीचे वत्र्चितो परिवत्र्चीतो , नाशिक येथील हं. प्रा. ठा. कला महाविद्यालयाच्या वतीने प्राणवल्लभा, रात्री नाशिक येथील रंगकर्मी थिएटर्सच्या वतीने आलम्ब:, दोन रोजी नाशिक येथील श्री सिद्धेश्वर संस्थानच्या वतीने खत्र्जमयूर:, भुसावळ येथील ब्राह्मण संघाच्या वतीने मृत्यू : जन्मस्य, मुलूंड येथील महाराष्ट्र सेवा संघाच्या वतीने यमदूती आणि परभणी येथील झपूर्झा फाऊंडेशनच्या वतीने चिरंजीव ही संस्कृत नाटके सादर होणार आहेत. नाशिककरांनी संस्कृत नाट्य स्पर्धेस उपस्थित रहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.