मनमाड : भरधाव इंधन टँकरची धडक बसल्याने मोटारसायकलीवरील दोन मुलांसह चार जणांचा मृत्यू झाला. मोटारसायकलीवरुन एकाच कुटूंबातील तीन मुलांसह सहा जण जात असताना मनमाड-नांदगाव रस्त्यावरील पानेवाडी गावाजवळ मंगळवारी रात्री हा अपघात झाला.

एकाच मोटारसायकलवरुन तीन मुले, दोन महिला आणि एक पुरुष असे सहा जण जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यातील मूळ गावी जात जात होते. मनमाडपासून जवळच असलेल्या पानेवाडी येथे मनमाड-नांदगाव रस्त्यावर भारत पेट्रोलियम प्रकल्पातून इंधन भरून भरधाव जाणाऱ्या टँकरची मोटारसायकलीस धडक बसली. मोटारसायकलीचा चुराडा होऊन ती बाजूला फेकली गेली.

हेही वाचा…जिल्ह्यात दोन दिवसात ३३ संशयितांविरुध्द गुन्हे, अवैध व्यवसायांविरुध्द पोलिसांची कारवाई

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अपघातात मोटार सायकलस्वार सचिन मोहिते (२५), पत्नी वर्षा मोहिते (१९), मोहिते दाम्पत्याचे नातेवाईक ओम बोराळे (सहा), जय बोराळे (चार) यांचा मृत्यू झाला. उषा बोराळे, जगदिश बोराळे (दोन) हे जखमी आहेत. सचिन आणि ओम, जय या मुलांचा जागीच मृत्यू झाला. दोन महिला आणि मुलगा रस्त्याच्या कडेला फेकले गेल्याने गंभीर जखमी झाले. त्यांना ग्रामस्थांच्या सहकार्याने रुग्णवाहिकेतून मनमाड येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात वर्षा मोहिते यांचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. मनमाड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.