लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

नाशिक: क्रिप्टो करन्सीत गुंतवणूक केल्यास चांगला मोबदला मिळेल, असे आमिष दाखवित संशयितांनी एका व्यक्तीला सव्वा तीन लाख रुपयांना फसविले.

आणखी वाचा-मनमाड: तुरळक पावसामुळे शेतकरी चिंतेत, पेरण्या वाया जाण्याची भीती

याबाबत विष्णूकुमार बेटकरी (रजत पार्क, वनश्री कॉलनी,अंबड) यांनी तक्रार दिली. बेटकरी यांच्याशी जानेवारी महिन्यात इन्स्टाग्रामवरून संशयितांनी संपर्क साधला होता. क्रिप्टो करन्सीतील गुंतवणुकीवर जादा परताव्याचे आमिष दाखवित विविध बँकांच्या वेगवेगळ्या खात्यात पैसे टाकण्यास भाग पाडले. महिनाभरात बेटकरी यांनी तीन लाख २५ हजाराची गुंतवणूक केली. मात्र प्रारंभी दिलेल्या आश्वासनानुसार मोबदला दिला नाही. बेटकरी यांनी संशयितांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करूनही तो होऊ शकला नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात फसवणूक आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.