लोकसत्ता वार्ताहर
धुळे: महापालिकेतून जन्म-मृत्युचे दाखले मोफत मिळण्याच्या विषयाला बुधवारी महासभेत सर्वानुमते मंजूरी देण्यात आली. यामुळे आता हे दाखले मोफत मिळणार आहेत.
महापालिकेकडून धुळेकरांना विशिष्ट शुल्क आकारुन जन्म-मृत्युचे दाखले दिले जात होते. परंतु, या प्रक्रियेला उशीर लागत असल्याने नागरिकांना शुल्क देऊनही मनपात चकरा माराव्या लागत होत्या. त्यामुळे धुळेकर त्रस्त होेते.
हेही वाचा… आज ग्रामीण भागात झडत्यांनी गाजणार बैलपोळयाची संध्या
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
ही जनभावना लक्षात घेऊन भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर यांनी महापालिकेकडे जन्म-मृत्युचे दाखले कुठलेही शुल्क न आकारता नागरिकांना मोफत द्यावेत, अशी मागणी केली होती. तो विषय बुधवारी झालेल्या महासभेत घेण्यात आला. त्या विषयाला महासभेेत सर्वानुमते मंजूरी देण्यात आली.