जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील ११ ग्रामपंचायतीच्या निवडणुकांसाठी रविवारी मतदान घेण्यात आले. यामधये यावल तालुक्यातील मालोद, परसाडे बुद्रुक ग्रामपंचायतींत सदस्यपदाच्या २४ आणि सरपंचपदाच्या दोन जागांसाठीही मतदान घेण्यात आलं होतं. मतदानानंतर सोमवारी सकाळी १० वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली.

हेही वाचा- नाशिक : जायकवाडी तुडूंब भरेल इतके पाणी प्रवाहीत ; हंगामात १०४ टीएमसीचा विक्रमी विसर्ग

११ ग्रामपंचायतींसाठी ८२.९९ टक्के मतदान

चोपडा तालुक्यातील ग्रामपंचायतींसाठी सरासरी ८२.९९ टक्के, तर यावल तालुक्यातील दोन ग्रामपंचायतींसाठी सरासरी ८३ टक्के मतदान झाले. पोलीस बंदोबस्तात मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली. मतदान केंद्रांत मतदारांच्या रांगा दिसून आल्या. तालुक्याच्या ठिकाणी तहसील कार्यालयात मतमोजणी होत आहे. दुपारी तीनपर्यंत निकाल लागण्याची शक्यता आहे. चोपडा तालुक्यातील सातपुडा पर्वत रांगांमधील आदिवासी गावांत अर्थात पेसाअंतर्गत १० गावांमध्ये आणि पेसाबाहेरील एका गावात अशा ११ ग्रामपंचायतींसाठी ८२.९९ टक्के मतदान झाले. या ११ ग्रामपंचायतींत ४२उमेदवार सरपंचपदासाठी नशीब आजमावत आहेत. ११ ग्रामपंचायतींत ३७ प्रभाग असून, सदस्यसंख्या ९९ आणि सरपंच ११ आहेत. सरपंचपदासाठी ७७ उमेदवार, तर सदस्यपदासाठी २०१ उमेदवार भवितव्य आजमावत आहेत.

हेही वाचा- सर्व महापालिका निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढणार – प्रदेशाध्यक्ष नाना पटोले

कर्मचार्‍यांसाठी महामंडळाच्या बसची व्यवस्था

मतदानस्थळी कर्मचार्‍यांना ने-आणसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसची व्यवस्था करण्यात आली होती. तहसीलदार अनिल गावित, प्रभारी नायब तहसीलदार रवींद्र माळी, केंद्रप्रमुख नरेंद्र सोनवणे, नायब तहसीलदार बंबाळे, डी. एम. नेतकर यांच्यासह इतर कर्मचार्‍यांनी निवडणुकीसाठी व्यवस्था केली. ग्रामपंचायतीच्या निवडणुका आदिवासी बहुल भागात आहेत. त्यात बोरअजंटी, कृष्णापूर, मोहरद, पिंपरी, देव्हारी, वैजापूर, कर्जाणे, मेलाणे, मोरचिडा, उमर्टी, सत्रासेन या ११ ग्रामपंचायतींचा समावेश आहे.