माजी मंत्री सुरेशदादा जैन यांनी शहराच्या विकासासाठी आम्हाला सहकार्य करावं आणि त्यांनी पुन्हा मैदानात उतरावं, अशी अपेक्षा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केली. तत्कालीन पालिकेतील घरकुल घोटाळा प्रकरणात माजी मंत्री सुरेश जैन यांना मुंबई उच्च न्यायालयाने नियमित जामीन मंजूर केला आहे. शहरात जैन यांचे बुधवारी रात्री आगमन झाले. गुरुवारी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जैन त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली, त्यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

हेही वाचा- राजकारणातील पुनरागमनास कुटूंबीयांचा विरोध; सुरेश जैन सध्या राजकारणापासून दूरच

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पालकमंत्री पाटील म्हणाले की, सुरेशदादा यांचे बोट पकडून आम्ही राजकारणात आलो. त्यांनी आयुष्यामध्ये जनतेला वेळ दिला आहे, आता त्यांनी कुटुंबाला वेळ देण्यास सुरुवात केली आहे. आमच्याकडून ज्या चुका होत असतील, तर त्या दुरुस्त करण्यासाठी मार्गदर्शन करीत राहावं आणि जळगाव शहराच्या विकासासाठी दादांनी सहकार्य करावं, अशी अपेक्षा राहणार आहे. दादांची पहिल्यापासूनच मार्गदर्शकाची भूमिका होती. ते मुंबईतही होते, तरी त्यांचे लक्ष आपल्या कर्मभूमीकडे होते. आता दादांनी मैदानात आलंच पाहिजे, असे पाटील यांनी सांगितले. दरम्यान, सुरेश जैन हे शिवसेना ठाकरे गटात की शिंदे गटात जाणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.