नाशिक – गुटख्याची तस्करी करणारा आंतरराज्य गुन्हेगार इसरार मन्सुरी याला इंदूरमधून नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली असून त्यास एक मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मुंबई-आग्रा महामार्गावर मुंबईकडे जाणारा कंटेनर पकडून सुमारे २१ लाखांचा गुटखा जप्त केला होता. याप्रकरणी इगतपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करुन अमृत सिंह (रा. वडवेली), पूनमचंद चौहाण (रा. सकारगाव) यांना अटक करण्यात आली. संशयितांकडून गुटख्याची साठवणूक करून राज्यात तस्करी करणारा मुख्य गुन्हेगार इसरार मन्सुरी हा असल्याची माहिती मिळाली. मन्सुरी हा महाराष्ट्रासह अन्य राज्यात गुटख्याची मोठ्या प्रमाणात तस्करी करत असल्याचे उजेडात आले. जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने यांनी मन्सुरी यास ताब्यात घेण्याच्या सूचना देण्यात आल्यावर स्थानिक गुन्हे शाखेचे पथक इंदूर येथे गेले. शहरातील राऊ परिसरात रात्रभर पाळत ठेवून पथकाने मन्सुरी याला ताब्यात घेतले. त्याला न्यायालयात हजर केले असता एक मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मन्सुरी हा इंदूर येथे गुटख्याची साठवणूक करुन कंटेनरमधून गुटख्याची विविध राज्यांमध्ये चोरटी वाहतूक करत होता. मन्सुरी ताब्यात आल्याने गुटखा वाहतुकीची पाळेमुळे शोधण्यात यश येईल, असा पोलिसांना विश्वास आहे.