नाशिक – शिवाजीनगर जलशुद्धीकरण केंद्रातील विविध कामे, अमृतमणी जलकुंभ भरणाऱ्या मुख्य जलवाहिनीची दुरुस्ती, अन्य एका जलवाहिनीची दुरुस्ती ही कामे बुधवारी केली जाणार असल्याने सातपूर, नाशिक पश्चिम आणि सिडकोतील जवळपास १२ प्रभागातील पाणी पुरवठा बंद ठेवला जाणार आहे. गुरुवारी सकाळी या भागात कमी दाबाने पाणी पुरवठा होईल. एक, दीड महिन्यापासून महानगरपालिका वेगवेगळ्या भागात दुरुस्ती व तत्सम कारणांनी पाणी पुरवठा बंद ठेवत आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, थेट पाणी कपात न करता या माध्यमातून ती अप्रत्यक्षपणे केली जात असल्याची साशंकता नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

याबाबतची माहिती महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने दिली आहे. सातपूर विभागात पाणी पुरवठा विभागाशी संबंधित विविध स्वरुपाची कामे तातडीने करणे आवश्यक झाले आहे. त्यामुळे बुधवारी पाणी पुरवठा बंद ठेवणे क्रमप्राप्त आहे. दुरुस्ती कामांमुळे सातपूर विभागातील सर्व प्रभागात पाणी पुरवठा बंद राहील. यात प्रभाग क्रमांक आठ, नऊ, १०, ११, २६ आणि २७ मधील चुंचाळे, दत्तनगर, माऊली चौक परिसराचा समावेश आहे. नाशिक पश्चिम विभागातील प्रभाग क्रमांक सातमधील नहुष सोसायटी परिसर, पूर्णवादनगर, दादोजी कोंडदेवनगर, अरिहंत नर्सिंग होम, आकाशवाणी केंद्र परिसर, तिरुपती टाऊन, सहदेवनगर, सुयोजित गार्डन, आयचितनगर, गीतांजली सोसायटी, पंपिंग स्टेशन, शांती निकेतन व परिसर,
प्रभाग १२ मधील महात्मानगर जलकुंभ परिसर, पारिजातनगर, समर्थनगर कामगारनगर, सुयोजित गार्डन, वनविहार कॉलनी, उत्कर्ष कॉलनी, लव्हाटेनगर, पत्रकार कॉलनी, महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनी, संभाजी चौक, उषाकिरण सोसायटी, क्रांतीनगर, श्रीमंडळ जलकुंभ परिसर, तिडके कॉलनी, राहुलनगर, मिलिंदनगर, कुटे मार्ग, चांडक सर्कल, तुपसाखरे लॉन्स, मातोश्री नगर, सहवासनगर, कालिकानगर, गडकरी चौक, गायकवाड नगर परिसर आणि सिडकोतील प्रभाग २५ मधील इंद्रनगरी, कामठवाडा, धन्वंतरी रुग्णालय महाविद्यालय, महालक्ष्मीनगर, दत्तनगर, मटालेनगर, प्रभाग २६ मधील शिवशक्ती नगर, आयटीआय पुलाजवळील परिसर, बॉम्बे टेलर परिसर, प्रभाग २७ मधील चुंचाळे घरकुल योजना, दातीर मळा, अलीबाबानगर, अंबड मळे परिसर आणि प्रभाग २८ मधील खुटवडनगर, माऊली लॉन्स, वावरेनगर, अंबड गाव, महालक्ष्मी नगर या परिसराचा समावेश आहे.

Mumbai Women Buys 19 Flats Worth 118 Crores In Malbar Hill
“बंगल्यासमोर बिल्डिंग बांधली, समुद्र कसा बघू?”, म्हणत दक्षिण मुंबईत १९ फ्लॅट्स विकत घेणारी ‘ती’ आहे तरी कोण?
Nashik Elderly Mans Enthusiastic Dance with old aged friends
“मी पाहिले तुझ्या डोळ्यांच्या आतुन..” नाशिकच्या आजोबांनी मित्रांसह केला मनसोक्त डान्स, VIDEO पाहून नेटकरी म्हणाले, “आयुष्याचा खरा आनंद..”
nashik lok sabha,
नाशिकमध्ये महायुतीत अचानक शांतता
UP 10th Standard Topper Girl Prachi Nigam Facial Hair Controversy
अगं प्राची, दहावी बोर्डात पहिली आलीस पण चेहऱ्यावरचे केस काढता आले नाही? नक्की लाज कुणी सोडलीये?

हेही वाचा – वंचितच्या भूमिकेने औरंगाबादमध्ये ठाकरे गटात चलबिचल

हेही वाचा – विश्लेषण : वनखात्यातील अधिकारी दीपाली चव्हाण आत्महत्या प्रकरण काय आहे? वनखात्याची भूमिका वादग्रस्त कशी?

हेही वाचा – विश्लेषण : मराठा मतपेढी मराठवाड्यात किती प्रभावी? जरांगेंमुळे मतदानाची समीकरणे बदलतील?

उपरोक्त भागात बुधवारी सकाळी नऊनंतर पाणी पुरवठा होणार नाही. गुरुवारी सकाळचा पाणी पुरवठा कमी दाबाने होईल. नागरिकांनी याची नोंद घेऊन सहकार्य करावे, असे आवाहन पाणी पुरवठा विभागाने केले आहे.