नाशिक- जिल्ह्यातील चांदवड-मनमाड मार्गाने अवैधपणे जिलेटिन कांड्यांची वाहतूक करणारी मालमोटार चांदवड पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. मालमोटारीतील तीन संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून हा साठा कशासाठी नेण्यात येत होता, याची चौकशी करण्यात येत आहे.

हेही वाचा – मनमाड : बिबट्या आल्याची अफवा अन् वन विभागाची धावपळ

हेही वाचा – नाशिक जिल्ह्यात चार संशयितांकडून तलवार, कुऱ्हाड जप्त

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चांदवड – मनमाड मार्गाने एका मालमोटारीतून जिलेटिनची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर चांदवड पोलिसांनी सापळा रचत संशयित वाहन अडवले. वाहनातील चरणसिंग सुलाने (२९, रा. छत्रपती संभाजीनगर), भुपेंद्र मेबाडा (३०, रा. बारली), दिनेश मोदी (रा. छत्रपती संभाजीनगर) यांना ताब्यात घेतले. वाहनामधून अवैधरित्या स्फोटक पदार्थाची वाहतूक केल्याप्रकरणी संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बॉम्ब शोधक पथक या प्रकरणाची चौकशी करत आहे. पोलिसांनी वाहनासह सुमारे आठ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.