धुळे : जबर मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या नवनाथ नगरमधील युवकाचा दवाखान्यात मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणी दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. शुभम साळुंखे (२७, रा.नवनाथ नगर, वाखारकर नगर परिसर, धुळे.) याच्या घरावर रविवारी रात्री दगडफेक झाली होती. दगडफेकीच्या घटनेनंतर शुभम शहरातील गांधी चौकात आला. यावेळी त्याला गोल पोलीस चौकीजवळ काही जणांकडून मारहाण झाल्याचे सांगितले जाते.

हेही वाचा : असुविधांविरोधात जळगावात शरद पवार गटाचे भजन आंदोलन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मारहाणीनंतर शुभम यास वरखेडी रस्त्यावर महापालिकेच्या कचरा केंद्राजवळ टाकून हल्लेखोर पसार झाले. जखमी शुभम यास रात्री पोलिसांनी हिरे शासकीय महाविद्यालयाच्या सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान सोमवारी शुभमचा मृत्यू झाला. उपलब्ध सीसीटीव्ही चित्रणावरुन पोलीस हल्लेखोरांची ओळख पटविण्याचा प्रयत्न करत असून दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.