धुळे : हिंदू-मुस्लिम विवाह पूर्वीपासून होत आले आहेत. अलीकडे मात्र लव्ह जिहादच्या नावावर वाद उकरले जात असून प्रत्यक्षात एकही तक्रार दाखल नाही, असा दावा समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांनी येथे पत्रकार परिषदेत केला.

सध्याचे सरकार संविधानाच्या विरोधात आहे. राज्यात जवळपास तीन हजारावर शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या असून यावर तोडगा काढण्याऐवजी सरकार केवळ विकासाची आश्वासने देत आहे. सर्वत्र गुन्हेगारी वाढली आहे. अमानुष मारहाणीचे प्रकार अनेक ठिकाणी घडत आहेत. मराठा समाजाला आरक्षण देण्यात आले, पण मुस्लिमांना दिले नाही.आरक्षण संपवले जात असून नोकऱ्याच शिल्लक राहिल्या नसल्याची सद्याची परिस्थिती आहे. धुळ्यात दंगलीतील मृतांच्या वारसदारांना अजूनही मदत मिळाली नसल्याचे आझमी यांनी सांगितले.

हेही वाचा…धुळे जिल्ह्यातील उद्योग क्षेत्रात परिषदेतून किती कोटींची गुंतवणूक ?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

धुळे लोकसभेची जागा लढविण्याची तयारी पक्षाने ठेवली आहे. याशिवाय मुंबई उत्तर आणि दक्षिण मुंबईतही चाचपणी केली जात आहे. ईव्हीएम नव्हे तर, मतपत्रिकेवर मतदान घेण्याचे आव्हानही आझमी यांनी दिले. राहुल गांधी यांनी आपली प्रतिमा बदलली असून ते चांगले नेते म्हणून पुढे येत आहेत. त्यांची पूर्वीची प्रतिमा राहिली नसून अलीकडे बदलली आहे. हे त्यांनी त्यांच्या कर्तृत्वातून सिद्धही केले आहे, असे आझमी यांनी नमूद केले.