scorecardresearch

Premium

धुळे : अवाजवी मालमत्ता कराच्या निषेधार्थ ठाकरे गटातर्फे रेड्याची मिरवणूक

करवाढीच्या निषेधार्थ रेड्याच्या पाठीवर मनपा आयुक्त आणि वाढीव घरपट्टी यांचा उल्लेख करीत मिरवणूक काढण्यात आली. मनपा प्रशासन, आयुक्त आणि सत्ताधारी भाजप यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

Dhule city, Municipal corporation, Thackeray group, protest, property tax
धुळे : अवाजवी मालमत्ता कराच्या निषेधार्थ ठाकरे गटातर्फे रेड्याची मिरवणूक ( छायाचित्र – लोकसत्ता टीम )

धुळे महापालिकेने देवपूरसह शहरातील रहिवाश्यांकडून अवाजवी मालमत्ता कर आकारणी सुरु केली असून हा धुळेकरांवर अन्याय असल्याची टीका करीत मनपा प्रशासनाच्या या मनमानीविषयी भाजप शहर जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल यांनी भूमिका मांडावी, अशी मागणी ठाकरे गटाने केली आहे. या करवाढीच्या निषेधार्थ रेड्याच्या पाठीवर मनपा आयुक्त आणि वाढीव घरपट्टी यांचा उल्लेख करीत मिरवणूक काढण्यात आली. मनपा प्रशासन, आयुक्त आणि सत्ताधारी भाजप यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

शहरात दोन वर्षांपूर्वी एका खासगी कंपनीला ठेका देऊन जिओ मॅपिंग आणि ड्रोनद्वारे शहरातील मालमत्तांचे सर्वेक्षण करण्यात आले. हे सर्वेक्षण केल्यानंतर स्थायी समिती आणि सभागृहाच्या सभेत ठराव मंजूर करणे आवश्यक असताना तसे न करता आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, वसुली विभागातील बड्या अधिकाऱ्यांनी मनमानी पध्दतीने पहिल्या टप्प्यात सुमारे २४५०० पुनर्मूल्यांकन केलेल्या मालमत्ता धारकांपैकी ११५०० मालमत्ता धारकांना नोटीसा बजावल्या. अशाच पध्दतीने टप्प्यांटप्प्यांत सर्व मालमत्ता धारकांना या नोटीसा बजावण्यात येणार असून हा सर्व प्रकार सर्व नियम धाब्यावर बसवून सुरू आहे. धुळेकरांनी नोटीस दाखल झाल्यानंतर लागलीच हरकती नोंदवाव्यात, असे आवाहन ठाकरे गटातर्फे करण्यात आले आहे.

canada allegations on india
India-Canada Conflict: कॅनडाचे भारतावर आरोप, अमेरिका व ऑस्ट्रेलियाचा कॅनडाला पाठिंबा; जागतिक स्तरावर भारतविरोधी भूमिका!
abhidnya bhave shared swami samarth experience
नवऱ्याच्या आजारपणात अभिज्ञा भावेला ‘अशी’ आली स्वामींची प्रचिती; अनुभव सांगत म्हणाली, “तेव्हा माझ्या डोळ्यात…”
donald trump
“डोनाल्ड ट्रम्प यांचा मृत्यू झालाय”, माजी राष्ट्राध्यक्षांच्या मुलाच्या ट्वीटनंतर खळबळ, नेमकं प्रकरण काय?
What Udaynidhi Stalin Said?
उदयनिधी स्टॅलिन यांचा भाजपाला सवाल, “हाच का तुमचा सनातन धर्म? राष्ट्रपती विधवा आहेत म्हणून..”

हेही वाचा… धुळे: साहेब, पाया पडतो पण पाणी सोडा…! माजी आमदाराची धुळे जिल्हाधिकार्यांकडे मागणी

हेही वाचा… नाशिक: आजपासून नाफेडकडून कांदा खरेदी; राज्यात तीन लाख मेट्रिक टनची खरेदी होणार

आंदोलनाच्या वेळी संहसंपर्कप्रमुख महेश मिस्त्री, संपर्कप्रमुख प्रा. शरद पाटील, महिला आघाडीच्या उत्तर महाराष्ट्र संपर्कप्रमुख शुभांगी पाटील, जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, उपजिल्हाप्रमुख किरण जोंधळे, महानगरप्रमुख धीरज पाटील आदी उपस्थित होते.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 01-06-2023 at 11:28 IST

संबंधित बातम्या

गणेश उत्सव २०२३ ×