जळगाव : जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदारसंघांच्या मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण करून तयार करण्यात आलेल्या प्रारूप मतदान केंद्रांच्या याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. याद्यांबाबत हरकती व सूचना दोन ऑक्टोबरपर्यंत दाखल करता येणार आहेत, असे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले. जिल्ह्यातील चोपडा, रावेर, भुसावळ, जळगाव शहर, जळगाव ग्रामीण, अमळनेर, एरंडोल, चाळीसगाव, पाचोरा, जामनेर, मुक्ताईनगर अशा एकूण ११ विधानसभा मतदारसंघांच्या याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.

हेही वाचा : जायकवाडी : जलसंपदा विभागाचे दोन विसंगत अहवाल, महसूलमंत्र्यांचा आक्षेप

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मतदान केंद्राच्या प्रारूप याद्या जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक शाखा, जिल्ह्यातील सर्व संबंधित विधानसभा मतदारसंघांच्या मुख्यालयी तसेच संबंधित विधानसभा मतदारसंघाच्या तालुक्याच्या ठिकाणी मतदारांच्या अवलोकनार्थ ठेवण्यात आल्या आहेत, असेही जिल्हाधिकारी प्रसाद यांनी म्हटले आहे.