मनमाड : शहरातील शाकुंतल नगरात पाणी भरण्यासाठी लावलेल्या वीज मोटारीला धक्का लागून महिलेचा मृत्यू झाला. पावसाअभावी शहरास टंचाईला तोंड द्यावे लागत आहे. महिन्यातून एकदाच नळाव्दारे पाणी पुरवठा होतो. त्यामुळे पाणी आल्यावर ते भरण्यासाठी मोठी लगबग असते. याच धावपळीत महिलेला प्राण गमवावे लागल्याची भावना व्यक्त होत आहे. नगरपालिकेकडून दुपारी नळाला पाणी सोडण्यात आले होते. त्यामुळे जास्तीचे पाणी मिळावे यासाठी बहुतेकांकडून नळाला वीज मोटार जोडली जाते. या मोटारीला घाईत ओला हात लागल्याने ही दुर्घटना घडल्याचे सांगितले जाते.

हेही वाचा : नाशिकमध्ये मिरवणूक मार्गावर ६७ सीसीटीव्ही कॅमेरे, सहा ड्रोनद्वारे नजर; साडेतीन हजार अधिकारी, जवानांचा बंदोबस्तात सहभाग

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विजेचा धक्का लागून जयश्री महिरे (४८, शकुंलनगर, मनमाड) या महिलेचा मृत्यू झाला. मनमाडच्या भीषण पाणी टंचाईने महिलेचा बळी घेतल्याची भावना नागरिकांमधून उमटत आहे. संपूर्ण पावसाळ्यातही मनमाडला टंचाईला तोंड द्यावे लागते. महिन्यातून एकदाच नळातून पाणी पुरवठा केला जातो. जेव्हा एखाद्या भागात पाणी पुरवठा होणार असतो, तेव्हा कितीही महत्वाची कामे असली तरी नागरिकांना घराबाहेर पडता येत नाही. कारण, त्या काळात घरात पाणी भरून ठेवले नाही तर महिनाभर पाणी मिळणार नसते. पाणी आल्यानंतर एकच धावपळ उडते. शक्य तितका साठा करावा लागतो. त्याच धावपळीत महिलेचा बळी गेल्याचे सांगितले जाते.