नाशिक : जिल्ह्यात महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने कुपोषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजना पुरेशा नसल्याचे पुन्हा एकदा दिसून आले असून त्र्यंबकेश्वर तालुक्यात १४ कुपोषित बालके आढळून आली आहेत. या बालकांवर उपचारासाठी ग्राम बाल विकास केंद्र (व्हीसीडीसी) सुरू करण्याचे आदेश बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांनी दिले आहेत.

त्र्यंबकेश्वर येथील अंजनेरी, त्र्यंबक ग्रामीण, रोहिले, सामुंडे, टाकेदेवगांव येथे १४ तीव्र कुपोषित बालके आढळली आहेत. या बालकांना सर्वसाधारण श्रेणीत आणण्यासाठी त्र्यंबकेश्वर येथील बालविकास प्रकल्प कार्यालय आणि आरोग्य विभाग प्रयत्न करत आहे. कुपोषित बालकांकडे दुर्लक्ष केल्यास बालकांमध्ये खुजेपणा, लुकडेपणा यासारख्या गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात.

IIT will take help to prevent suicides from Atal Setu Mumbai print news
अटल सेतूवरून होणाऱ्या आत्महत्या रोखण्यासाठी आयआयटीची घेणार; ‘एमएमआरडीए’ लवकरच तज्ज्ञांची समिती स्थापन करणार
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
Pench tiger project administration, Villagers
पेंच व्याघ्रप्रकल्प प्रशासनाविरोधात गावकरी रस्त्यावर
Fungi and netted food supply in Anganwadi
धक्कादायक! अंगणवाडीमध्ये बुरशी, जाळे लागलेला आहार पुरवठा
Death of a T-9 tiger, ​​Navegaon-Nagzira Sanctuary, tiger,
गोंदिया : वर्चस्वाच्या झुंजीत टी-९ वाघाचा मृत्यू; नवेगाव-नागझिरा अभयारण्याच्या गाभा क्षेत्रातील घटना
ulhas river water marathwada marathi news
विश्लेषण: उल्हास नदीचे पाणी मराठवाड्याला? प्रदूषण आणि स्थानिक टंचाईचे काय? प्रकल्पास विरोध का?
Illegal stock of Khair seized in Nandurbar district
नंदुरबार जिल्ह्यात खैराचा अवैध साठा जप्त; गुप्तपणे करण्यात आली कारवाई
diverting surplus water from ulhas and vaitrana sub basins godavari basin in Marathwada
बदलापूरः उल्हासचे प्रदुषित पाणी मराठवाड्याला नेणार का ? पर्यावरणप्रेमींचा सवाल, उल्हास, वैतरणाचे पाणी मराठवाड्यात नेण्याच्या निर्णयावर नाराजी

हेही वाचा…नाशिक महापालिकेसमोर भाजीपाला फेकून आंदोलन – अतिक्रमण निर्मूलन कारवाईचा निषेध

या बालकांना बरे करण्यासाठी अंगणवाडी, आशा सेविकांच्या माध्यमातून ग्राम बाल विकास केंद्र सुरू करावे, दोन महिने पोषण आहारासाठी निधी खर्च करावा, अशी सूचना करण्यात आली आहे. बालकांना वैद्यकीय मदत मिळावी, यासाठी ग्रामपंचायतीने प्रयत्न करावेत, असे आवाहन बाल विकास अधिकाऱ्यांनी केले आहे.