नाशिक : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील परिमंडळ (दोन) कार्यक्षेत्रातील २० गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. विधानसभा निवडणूक भयमुक्त वातावरणात पार पडावी, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलिसांकडून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत. शहरातील परिमंडळ (दोन) कार्यक्षेत्रात देवळाली कॅम्प, अंबड, उपनगर, नाशिकरोड, सातपूर या पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे.

यामध्ये देवळाली कॅम्पमधील रोहित गायकवाड (२५, रा. लहवित), अंबडमधील गणेश कुऱ्हे (२९, रा. मोरवाडी), वैभव शिर्के (२३, रा. गोपाळकृष्ण चौक), नागेश सोनवणे (३८, रा.उपेंद्रनगर), विशाल देवरे (२१, रा. पंडित नगर), उपनगरातील पियुष शिंदे (२०) आणि बबलू यादव (२१) दोन्ही राहणार सुंदरनगर, सातपूरमधील प्रतिक एकडी (२४, रा. पुष्पक पार्क), रोशन भाडमुखे (२१, रा. श्रमिक नगर), मिलिंद मुंढे (२१, रा. सातपूर), कल्पेश वाघ (२६, रा. शिवाजी नगर), सौरव खरात (२१, रा. धम्मचौक स्वारबाबा नगर), नाशिकरोड येथील लहू काळे (२०, रा. साखर कारखाना रोड), निरंक उर्फ नाऱ्या नरोटे (२२, रा. अरिंगळे मळा), शिरीष कांबळे (२४, रा. जाधववाडी), गौरव उर्फ सोनु भागवत (२०, रा. भागवत मळा), गणेश चव्हाण (२२, रा. पवारवाडी, दाऊत शेख (२०, रा. रेल्वे क्वाॅर्टर) यांच्यावर हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. नाशिक जिल्ह्याबाहेर या संशयितांना सोडण्यात आले आहे.

हेही वाचा : आदिवासी विद्यार्थ्यांना आता सामाजिक, भावनिक शिक्षण – ”अभिव्यक्ती” प्रकल्प

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आतापर्यंत या वर्षात परिमंडळ दोनचच्या हद्दीतील ९८ गुन्हेगारांवर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. तसेच ११ सराईत गुन्हेगारांविरूध्द एमपीडीए कायद्यानुसार स्थानबध्दतेची कारवाई करण्यात आली आहे. संघटितपणे गुन्हे करणाऱ्या चार टोळ्यांविरूध्द मोक्काअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.

मोनिका राऊत (पोलीस उपायुक्त)