नाशिक : जिल्ह्यातील काही भागात तीन ते चार दिवसांपासून दमदार पाऊस होत असताना सातत्याने बदलणाऱ्या वातावरणाचा परिणाम पक्ष्यांच्या स्थलांतरावर होत आहे. नांदुरमध्यमेश्वर अभयारण्यात स्थलांतरीत पक्ष्यांच्या आगमनास सुरूवात झाली असून पुढील काही दिवसांत नव्या पक्ष्यांची अधिक भर पडेल, असे पक्षीतज्ज्ञांचे मत आहे.

निफाड तालुक्यातील नांदुरमध्यमेश्वर परिसरात समाधानकारक पाऊस होत आहे. धरण परिसरात मुबलक स्वरूपात जलसाठा झाला आहे. थंडीची चाहूल लागल्यावर परदेशी पक्ष्यांचे अभयारण्यात येणे सुरु होते. यंदा मात्र वातावरणातील बदलामुळे पक्षी काही महिने आधीच अभयारण्यात दाखल होण्यास सुरूवात झाली आहे. स्थलांतरीत पक्षी रशिया, युरोपमधून प्रवास करत भारतात आल्यावर काही काळ विश्रांती घेतात. नंतर पुढील प्रवासासाठी अफ्रिकेकडे जातात.

hot temperature, reptiles, snakes affected, cold temperature, enters in citizen colony, marathi news, snake news, snake in uran, uran news, uran snake news,
उरण : उन्हाच्या तडाख्याचा सरपटणाऱ्या प्राण्यांना फटका, गारव्यासाठी नागरी वस्तीत शिरकाव
Birds mumbai, Birds suffer from heat,
मुंबई : वाढत्या उष्म्याचा पक्ष्यांना त्रास, १६ दिवसांमध्ये १०० हून अधिक पक्षी व प्राणी रुग्णालयात दाखल
श्श्श्श… वाघोंबांची तलावामध्ये सुरू आहे पूल पार्टी; ‘ठंडा ठंडा कुल कुल’मुळे बाहेर निघायलाच तयार नाही
Tungareshwar Protected Forest is in danger
तुंगारेश्वरचे संरक्षित वन धोक्यात, पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रात प्रदूषणकारी कारखाने व अतिक्रमण

हेही वाचा : मधमाश्यांच्या हल्ल्यात वृध्दाचा मृत्यू, धुळे तालुक्यातील घटना

यावर्षी कुठे भरपूर पाऊस तर, कुठे पाऊसच नाही, अशी स्थिती असल्याने याचा परिणाम पक्ष्यांच्या स्थलांतर चक्रावरही होत आहे. त्यामुळेच यंदा ब्ल्यू चीक, बी इटर, सायबेरियन स्टोन चाट या पक्ष्यांचे काही महिने आधीच नांदुरमध्यमेश्वर अभयारण्यात आगमन झाले आहे. नांदुरमध्यमेश्वर अभयारण्यात मुबलक स्वरूपात जैव विविधता आहे. पक्ष्यांना आवश्यक खाद्य असल्याने या ठिकाणी पक्ष्यांचा किलबिलाट कायम असतो. हा परिसर विदेशी पक्ष्यांनाही खुणावतो. पुढील महिन्यात पक्ष्यांची संख्या अधिक वाढण्याची शक्यता असून यासंदर्भात वन विभागाने या पक्ष्यांची नोंद घेणे आवश्यक असल्याचे पक्षीमित्रांचे म्हणणे आहे.

हेही वाचा : भाजपचे नाशिक लोकसभेच्या जागेवर लक्ष, दिंडोरी मतदार संघापासून प्रदेशाध्यक्ष दूर

वन विभागाकडून नियोजन गरजेचे

‘वातावरणातील बदलाचा परिणाम पक्ष्यांच्या स्थलांतरावर होत आहे. मागील वर्षाच्या तुलनेत काही दिवस आधीच पक्षी अभयारण्यात दाखल झाले. वनविभाग ही नोंद ठेवत असेल तर उत्तम. अभयारण्यात पक्ष्यांसाठी मुबलक खाद्य आहे. या ठिकाणी असणारे पाणी वर्षभर राहिल असे नाही. या अनुषंगाने वनविभागाने नियोजन करणे आवश्यक आहे’, असे मत पक्षीतज्ज्ञ प्रा. आनंद बोरा यांनी व्यक्त केले.