नाशिक : जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील मंदिरांचा परिसरही आता विकासाच्या मार्गावर येणार असून राज्याच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने प्रादेशिक पर्यटन विकास २०२३-२४ या अंतर्गत जिल्ह्यातील १४ पर्यटन स्थळांच्या विकासासाठी तीन कोटी रुपयांच्या निधीला मान्यता दिली आहे. जिल्ह्याच्या ग्रामिण भागातील मंदिर परिसराचा विकास होण्यात निधी मिळत नसल्याचा अडथळा निर्माण झाला होता. त्यामुळे निधी उपलब्ध व्हावा, यासाठी खासदार हेमंत गोडसे यांच्याकडून वारंवार पाठपुरावा करण्यात येत होता. अखेर या प्रयत्नांना यश आले असून जिल्ह्यातील पर्यटन स्थळांच्या विकासासाठी तीन कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या निधीतून नाशिक तालुक्यातील तीन, इगतपुरी तालुक्यातील १० तर, त्र्यंबकेश्वर तालुक्यातील एका पर्यटन स्थळाचा विकास करण्यात येणार असल्याची माहिती खासदार गोडसे यांनी दिली आहे.

हेही वाचा : नाशिक : पोलीस चौकीच्या आवारात दोन गटांचा गोंधळ

Decrease in water storage in dams compared to last year
नागपूर : गतवर्षीच्या तुलनेत धरणांतील जलसाठ्यात घट
nashik, 14 Malnourished Children, Found in Trimbakeshwar Taluka, Treatment Malnourished Children , malnutrition in Trimbakeshwar Taluka, malnutrition in nashik, nashik news, Trimbakeshwar news,
त्र्यंबकेश्वर तालुक्यात १४ कुपोषित बालके, ग्राम बालविकास केंद्र सुरु करण्याचे आदेश
Engineer bribe Dhule district
धुळे जिल्ह्यात ग्रामसेविकेसह अभियंता लाच स्वीकारताना जाळ्यात
water shortage Nashik district
नाशिक : पाणी टंचाईचे नाशिक जिल्ह्यात दोन बळी, मायलेकीचा विहिरीत पडून मृत्यू

मंजूर झालेल्या निधीतून नाशिक तालुक्यातील तळेगांव (अंजनेरी) येथील मारुती मंदिरामागे सभामंडप बांधणे, देवरगाव येथील मारुती मंदिर परिसराचे सुशोभिकरण करणे, दहेगाव येथील भवानी मंदिरासमोर मंडप बांधणे तसेच त्र्यंबकेश्वर तालुक्यातील खरोली येथील गावदेवी मारूती मंदिरासमोर सभामंडप बांधणे, या कामांसाठी प्रत्येकी २० लाख रुपयांच्या खर्चाला मान्यता मिळाली आहे. याशिवाय इगतपुरी तालुक्यातील जानोरी येथील मारुती मंदिरासमोर, गोंदे येथील भवानी माता मंदिराजवळ, वाडीवऱ्हे येथील दत्त मंदिरासमोर, , पिंपरी (सदो) जवळील तोरणपाडा येथे मारुती मंदिरासमोर, पिंपळगाव डुकरा येथील गोंडेवाडी परिसरातील मारुती मंदिराजवळ, वांजोळे येथील मारुती मंदिराजवळ, भावली येथील मारुती मंदिरासमोर सभामंडप आणि मुकणे येथील मारुती मंदिरासमोर सामाजिक सभागृहाची उभारणी करणे, या कामांसाठी प्रत्येकी २० लाख रुपये तर, बोर्ली येथील संत महाराज मंदिरासमोर सांस्कृतिक भवन उभारणे, कुशेगाव येथील देवी मंदिरासमोर सभामंडप बांधणे या कामांसाठी प्रत्येकी ३० लाखांचा निधी मंजूर झाला आहे.

हेही वाचा : चवदार भरीत पाहिजे? चला, जळगावला… भरिताच्या वांग्यांची रोज २५ टन आवक, भरीत पार्ट्यांमुळे मागणीत वाढ

ग्रामीण भागात सभामंडप, सामाजिक सभागृह यांचे महत्व वाढले आहे. गावातील विविध बैठका, धार्मिक कार्यक्रम हे सभामंडपात घेता येतात. सामाजिक सभागृह असेल तर, अशा ठिकाणी विवाह सोहळ्यांचेही आयोजन करण्यात येते. गावाच्या विकासासंदर्भात किंवा इतर विषयासंदर्भात संपूर्ण गावाला आमंत्रित करुन निर्णय घ्यावयाचा असल्यास सभामंडप योग्य ठरते. त्यामुळे ग्रामस्थांकडून गावात एकतरी सभामंडप असावे, अशी मागणी होऊ लागली आहे. राज्याच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने जिल्ह्यातील १४ पर्यटन स्थळांच्या विकासासाठी, मंदिरांच्या सुशोभिकरणासाठी निधी उपलब्ध करून त्या त्या गावांच्या विकासाला चालना मिळण्यास हातभार लागणार आहे.