नाशिक : आदर्श आचारसंहिता लागू झाल्यानंतर शहर आणि ग्रामीण भागात राजकीय पक्षांची भित्तीपत्रके, फलक व झेंडे काढण्याचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. सार्वजनिक ठिकाणी विद्रुपीकरणास कारक ठरलेले १७ हजार ५०७ राजकीय फलक, भित्तीपत्रक, झेंडे हटवले गेले. विनापरवानगी २६६८ खासगी जागांवर रंगविलेल्या भिंती, भित्तीपत्रके व फलक हटविण्यात आल्याची माहिती निवडणूक यंत्रणेने दिली. नाशिक महापालिकेने संपूर्ण कार्यवाही तीन दिवसांत पूर्णत्वास नेण्याचे लक्ष्य ठेवले आहे.

शनिवारी दुपारी आचारसंहिता लागू झाल्यानंतर महानगरपालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने सार्वजनिक ठिकाणी असणारे राजकीय फलक, भित्तीपत्रके, झेंडे काढण्याचे काम युध्दपातळीवर सुरू केले. या विभागाचे अधिकारी नितीन नेर यांनी दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत जवळपास तीन हजार फलक, भित्तीपत्रके व झेंडे काढण्यात आले आहेत. ही प्रक्रिया तीन दिवसांत पूर्णत्वास नेली जाणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. राजकीय पक्षांच्या कार्यालयाच्या दर्शनी भागातील फलक वा चिन्ह झाकून ठेवावे लागतात की नाही, याबाबत संभ्रम होता. परंतु, खासगी जागेतील फलक वा तत्सम बाबी लावण्यासाठी पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक आहे. राजकीय पक्षांची कार्यालये खासगी जागेत असतात. निवडणूक आयोगाचा निकष शासकीय, निमशासकीय व सार्वजनिक जागेत लागू होतो. अशा जागेवरील फलक, राजकीय पक्षांचे झेंडे, भित्तीपत्रके काढण्याचे काम प्रगतीपथावर आहे.

Ambedkarist activists active in support of Mavia Discuss the danger of changing the constitution
‘मविआ’च्या समर्थनार्थ आंबेडकरवादी कार्यकर्ते सक्रिय; राज्यघटना बदलली जाण्याच्या धोक्याची चर्चा
Samajwadi Party decision to win the Maha Vikas Aghadi to break Modi dictatorship
मोदींची एकाधिकारशाही मोडून काढण्यासाठी महाविकास आघाडीला विजयी करणार; समाजवादी पक्षाचा निर्णय
BJP experiment, south Mumbai,
मते वाढविण्याचा भाजपचा प्रयोग
Uddhav Thackeray, Mahayuti, campaign,
उद्धव ठाकरे यांना आयतेच कोलीत

हेही वाचा…नाशिकमध्ये भाजप-राष्ट्रवादीकडून शिंदे गटाची कोंडी

निवडणूक शाखेच्या माहितीनुसार जिल्ह्यातील सर्व मतदारसंघात राजकीय पक्षांचे फलक, जाहिरातीसाठी रंगविलेल्या भिंती, भित्तीपत्रके व झेंडे काढण्याचे काम सुरू असल्याचे म्हटले आहे. नाशिक मध्य भागात सार्वजनिक जागेतील २२६९ रंगविलेल्या भिंती, फलक व तत्सम घटक हटविले गेले. तर देवळा मतदारसंघात १०७६ पैकी ७२४, इगतपुरी मतदारसंघात २५१८, नांदगाव ६४४, कळवण १८७९, चांदवड १५७१, येवला २९२९, निफाड १६०९, दिंडोरी २३५७, मालेगाव बाह्य ३२७ व बागलाण मतदारसंघात १००७ घटक हटविले गेले. याच स्वरुपाची कारवाई खासगी जागेतील विना परवानगी उभारलेले फलक, भिंतींचे रंगकाम आदी घटकांवर करण्यात आली. यात रंगविलेल्या भिंती १९९, भित्तीपत्रके ३५३, फलक ३६२ आणि अन्य १९५४ असे विद्रुपीकरणास हातभार लावणाऱ्या २८६८ प्रकरणात कारवाई करण्यात आल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. मालेगाव मध्य, सिन्नर आणि नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघाची आकडेवारी प्रशासनाकडे अद्याप उपलब्ध झालेली नाही.

हेही वाचा…नाशिक : काळ आला होता पण… जखमी शिक्षकांच्या मदतीला रुग्णवाहिका धावली

…तर विद्रुपीकरण कायद्यान्वये कारवाई

निवडणूक प्रचार करताना विनापरवाना खासगी व सार्वजनिक जागेवर, मालमत्तेवर भित्तीपत्रक लावणे अथवा निवडणूक चिन्ह लिहून व इतर कारणाने विद्रुप करण्यास प्रतिबंध आहे. अशी कृती करणाऱ्यांवर विद्रुपीकरण कायद्यान्वये कारवाई होऊ शकते, असे निवडणूक शाखेने स्पष्ट केले आहे.