नाशिक : नाशिककरांच्या श्रद्धेचा आणि उत्साहाचा आनंदोत्सव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्रीराम रथ आणि गरुड रथाच्या मिरवणुकीच्या तयारीला वेग आला असून श्री अहिल्याराम व्यायाम प्रसारक मंडळातर्फे गरुडरथ उत्सवाच्या कामकाजासंदर्भातील बैठकीत तयारीची माहिती देण्यात आली.

पंचवटीतील शौनकआश्रमात ही बैठक झाली. श्री काळाराम संस्थान मंदिर प्रशासनासह अहिल्याराम व्यायामशाळेची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. काही दिवसांपासून रथाची डागडुजी सुरू असून संस्थानचे विश्वस्त, मंदिराचे पूजाधिकारी आणि व्यायाम शाळेचे पदाधिकारी रथाची तांत्रिक चाचणी घेत आहेत. त्यामध्ये योग्य ती सुधारणा देखील करत आहेत.

हेही वाचा…भाजपचे माजी नगराध्यक्ष करण पवार यांना पक्षप्रवेशानंतर लगेचच ठाकरे गटाची जळगावमधून उमेदवारी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बैठकीत रथ मिरवणुकीचा मार्ग, रस्त्याची परिस्थिती, रथाच्या मार्गात लागणारी वाहने, गरुड रथाचे परीक्षण, रथ सजावटीचे काम, पोलीस आयुक्त आणि महापालिका आयुक्तांना द्यावयाची निवेदने, सुरक्षा व्यवस्था, रथाची लायटिंग, ब्रेक व्यवस्था, ध्वनी व्यवस्था, मार्गावरील मध्यभागी असणारे दिशादर्शक पांढरे पट्टे, रथसेवकांचा गणवेश, अहिल्याराम तालमीजवळची साफसफाई, रथ यात्रेदरम्यान येणाऱ्या अडचणी यांसह अनेक महत्वाच्या मुद्यांवर चर्चा करण्यात आली. यावेळी श्री अहिल्याराम व्यायामशाळेचे सर्व पदाधिकारी, युवा प्रतिनिधी आणि बलोपासक मोठ्या संख्येने उपस्थित होते.