केंद्र शासनातर्फे जाहीर करण्यात आलेल्या स्वच्छ सर्वेक्षण-२०२२ क्रमवारीत उत्तर महाराष्ट्रातील जळगाव आणि भुसावळ या शहरांना चांगले मानांकन मिळाले आहे. जळगाव शहर ८४ व्या, तर भुसावळ ९८ व्या स्थानी आहे.

हेही वाचा- नाशिक शहरातील सर्व ड्रोन पोलिसात जमा करा ; लष्करी आस्थापनांवरील विना परवानगी उडालेल्या ड्रोनच्या पार्श्वभूमीवर सूचना

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाच्या माध्यमातून स्वच्छ सर्वेक्षण-२०२२ नुसार शहरांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यात देशभरातील शहरांमधून सर्वेक्षण करून यातील स्वच्छतेविषयी मानांकन देण्यात आले आहे. यंदाच्या यादीत एक ते १० लाख लोकसंख्या असणार्‍या शहरांत जळगाव जिल्ह्यातील दोन शहरे असून, त्यात जळगाव आणि भसावळचा समावेश आहे. यंदा सर्वेक्षणात ३८२ शहरांना स्थान देण्यात आले आहे. जळगाव महापालिकेला ४२८६.८३, तर भुसावळ नगरपालिकेला ४१४४.७५ गुण प्रदान करण्यात आले आहेत.