जळगाव : लोकसभेच्या जळगाव आणि रावेर या मतदारसंघांची निवडणूक चौथ्या टप्प्यात होणार असून, १३ मे रोजी मतदान, तर चार जूनला निकाल घोषित केला जाईल. शहरात उद्योग कमी व गोदाम अधिक असून, त्यामुळे मतदारांना आमिष दाखविणार्‍यांवर लगाम लावण्यासाठी गोदामांची तपासणी केली जाणार आहे. धार्मिक स्थळांतून प्रचार होणार नाही यादृष्टीनेही काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी आयुष प्रसाद यांनी केले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हाधिकारी प्रसाद यांनी प्रसारमाध्यमांशी संवादात निवडणुकीबाबतची माहिती दिली. यावेळी पोलीस अधीक्षक डॉ. महेश्‍वर रेड्डी, अपर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे, निवडणूक उपजिल्हाधिकारी अरविंद अंतुर्लीकर आदी उपस्थित होते. जिल्ह्यातील लोकसभेच्या जळगाव व रावेर या दोन्ही मतदारसंघात निवडणूक प्रक्रिया राबविली जात आहे. निवडणुकीसाठी तयारी पूर्णत्वास आली आहे.

Innovative Polling Stations, Nagpur, Environment and Tribal Culture, nagpur lok sabha seat, polling station, slefie points, gadchiroli, nagpur polling station news,
मतदान केंद्रांवर जंगल, पर्यावरण, आदिवासी संस्कृतीचे दर्शन……
Farmers, Farmers news,
प्रकल्प घोषणेपूर्वी शेतकऱ्यांना विश्वासात घ्यावे
Violation of Right to Information by Regional Psychiatric Hospital in Nagpur
नागपुरातील प्रादेशिक मनोरुग्णालयाकडून माहिती अधिकाराचा भंग, सामाजिक कार्यकर्ते म्हणतात…
murlidhar mohol social media marathi news
पुण्यातील भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांचा सोशल मीडियावरील प्रचार अंगलट…जिल्हाधिकाऱ्यांनी बजावली ‘कारणे दाखवा’ नोटीस

हेही वाचा…आमदार आमश्या पाडवी यांची पाऊले शिंदे गटाकडे? ठाकरे गटाला पुन्हा एक धक्का

जळगाव मतदारसंघासाठी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, तर रावेरसाठी अपर जिल्हाधिकारी अंकुश पिनाटे यांच्याकडे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली आहे. जिल्ह्यात सुमारे ३५ लाख ११ हजार ७०३ मतदार आहेत. त्यात १८ लाख २० हजार ६४९ पुरुष आणि १६ लाख ९० हजार ९२३ महिला मतदार आणि १३१ तृतीयपंथी मतदार आहेत. सैनिक मतदारसंख्या आठ हजार २३ असून, यात पुरुष मतदार सात हजार ८९२, तर स्त्री मतदार १३१ आहेत.

जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदारसंघात ११ विधानसभा मतदारसंघ मिळून तीन हजार ५८२ मतदान केंद्रे येतात, तर उर्वरित एक विधानसभा मतदारसंघ मलकापूर (जि. बुलढाणा) मधील एकूण ३०४ केंद्रे ही रावेर लोकसभा मतदारसंघात समाविष्ट आहेत, अशी एकूण तीन हजार ८८६ केंद्रे आहेत. त्यात जळगाव लोकसभेसाठी शहर मतदारसंघात ३५८, ग्रामीणमध्ये ३३२, अमळनेरमध्ये ३२०, एरंडोलमध्ये २८९, पाचोर्‍यात ३२९ आणि प्रस्तावित मतदार केंद्रांत शहर मतदारसंघात एक, ग्रामीणमध्ये आठ, पाचोर्‍यासाठी तीन असे एकूण एक हजार ९८२ मतदार केंद्रे आहेत. तसेच रावेर लोकसभेसाठी चोपडा या अनुसूचित जमाती मतदारसंघात ३१९, रावेरमध्ये ३१२, भुसावळ (अनुसूचित जाती) मध्ये ३१४, जामनेरमध्ये ३२७, मुक्ताईनगरमध्ये ३२२, मलकापूर (जि. बुलडाणा) येथे ३०४ आणि प्रस्तावित मतदार केंद्रांत चोपड्यासाठी नऊ, तर रावेर, भुसावळसाठी प्रत्येकी दोन, असे एकूण एक हजार ९०४ मतदार केंद्रे सज्ज ठेवण्यात आली आहेत.

हेही वाचा…जळगावात पीक विमाप्रश्‍नी ठाकरे गटाचे अनोखे आंदोलन

आचारसंहिता अंमलबजावणीसाठी जिल्ह्यात विधानसभा मतदारसंघनिहाय फिरती पथके, स्थिर सर्वेक्षण पथके, व्हिडिओ सर्वेक्षण पथके, व्हिडिओ देखरेख पथके स्थापन करण्यात आली आहेत. ही पथके सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, तसेच अतिरिक्त सहायक निवडणूक निर्णय अधिकार्‍यांच्या निर्देशानुसार कार्यरत राहतील. फिरत्या पथकांना दंडाधिकारी अधिकार प्रदान करण्यात आले आहेत, तसेच मतदान केंद्रांच्या संख्येनुसार सेक्टर ऑफिसरही नियुक्त करण्यात आले आहेत. सार्वजनिक ठिकाणी जाहिरात केल्यास त्या हटविण्याची जबाबदारी प्रशासनाची असून, एखाद्याने घरावर किंवा खासगी मालमत्तांवर पक्षाचा किंवा उमेदवाराचा प्रचार केल्याचे निदर्शनास आल्यास त्यापोटी करआकारणी करून तो खर्च संबंधित उमेदवाराच्या नावावर टाकला जाणार असल्याचे जिल्हाधिकारी प्रसाद यांनी स्पष्ट केले.

प्रतिबंधात्मक, हद्दपारी, एमपीडीएसह अन्य कारवायांच्या माध्यमातून गुन्हेगारी प्रवृत्तीला लगाम लावण्याचे काम सुरू असून, जिल्ह्यात बीएसएफची तुकडी दाखल झाली आहे. परप्रांतांतून येणार्‍या शस्त्रांच्या साठ्यावरही लक्ष केंद्रित केले असल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. रेड्डी यांनी दिली.

हेही वाचा…धुळ्यात डाॅ. सुभाष भामरे यांची भाजप अंतर्गत विरोधकांवर मात

निवडणुकीची आचारसंहिता जिल्ह्यात लागू झाली आहे. विनापरवाना खासगी अथवा सार्वजनिक मालमत्तांवर फलक लावणे, घोषणा लिहिणे, निवडणूक चिन्ह लिहिणे, कापडी फलक लावणे, झेंडे लावणे व इतर कारणांनी मालमत्ता विद्रूपित करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. मालमत्ता विद्रूपित केल्यास तीन महिन्यांपर्यंत तुरुंगवास अथवा दोन हजारांपर्यंत दंड अथवा दोन्हीही शिक्षांना संबंधित पात्र राहतील. आचारसंहितेचे काटेकोर पालन करावे. – आयुष प्रसाद (जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी)