शिंदखेडा तालुक्यातील बेटावद येथील शेतजमिनीची हद्द कायम पोटहिस्सा मोजणीसाठी २० हजारांची लाच घेताना शिंदखेडा येथील भूमी अभिलेख कार्यालयातील छाननी लिपिकास जळगावच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. याप्रकरणी धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>>धुळे: सोडा गाडीवर दारु विक्री केल्यास कारवाई – पोलिसांचा इशारा

जळगावमधील महाबळ रोडवरील संभाजीनगरातील तक्रारदारांनी शिंदखेडा येथील भूमी अभिलेख कार्यालयाच्या उपअधीक्षकांकडे करार करून काम घेतलेल्या बेटावद येथील शेतजमिनीची हद्द कायम पोटहिस्सा मोजणीसाठी अतितातडीचे चलन भरून शेतमोजणीसंदर्भात अर्ज दिला होता. संबंधित काम करून देण्यासाठी भूमी अभिलेख कार्यालयाचा छाननी लिपिक सुशांत अहिरे (३६) याने तक्रारदारांकडून ११ नोव्हेंबर २०२२ रोजी ४० हजारांची मागणी करीत त्याच दिवशी २० हजार रुपये स्वीकारले. त्यानंतर उर्वरित २० हजार रुपये काम झाल्यानंतर देण्यास सांगितले. १४ नोव्हेंबर रोजी आणि सहा जानेवारी २०२३ रोजी पडताळणीदरम्यान उर्वरित २० हजार रुपये आणण्यास सांगितले. यासंदर्भातील तक्रार जळगावच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक शशिकांत पाटील यांच्याकडे करण्यात आली. त्यांनी तक्रारीची पडताळणी करीत पथक नियुक्त केले. पथकाने धुळे येथील भूमी अभिलेख कार्यालयात सापळा रचत छाननी लिपिक अहिरे यास २० हजारांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. याप्रकरणी धुळे येथील शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

हेही वाचा >>>शरद पवारांच्या गाडीत देवेंद्र फडणवीस, नव्या राजकारणाची नांदी आहे का? पंकजा मुंडे म्हणाल्या, “मला वाटतं…”

कोणत्याही शासकीय अधिकारी, कर्मचार्यांनी किंवा त्यांच्या वतीने खासगी व्यक्तीने कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी लाचेची मागणी केल्यास तत्काळ संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस उपअधीक्षक शशिकांत पाटील यांनी केले आहे.

Nashik News (नाशिक न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Land records clerk in shindkheda caught in bribery amy
First published on: 09-01-2023 at 12:29 IST