नंदुरबार – देश १० वर्षात विकला. महाराष्ट्रातील उद्योग गुजरातमध्ये नेले. किती वर्ष गांधी परिवाराच्या नावाने खडे फोडणार, असा प्रश्न  काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना केला आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची न्याय यात्रा नंदुरबारमार्गे महाराष्ट्रात येणार असून यानिमित्त आढावा घेण्यासाठी नंदुरबारमध्ये पटोले आले आहेत. शहा यांनी मंगळवारी जळगाव, संभाजीनगर येथील सभांमध्ये शरद पवार, उध्दव ठाकरे, राहुल गांधी यांच्यावर टीका केली होती. त्या टिकेला पटोले यांनी उत्तर दिले. विकास न करता भाजप १० वर्षापासून फक्त काँग्रेसवर टीका करण्याचे काम करत आहे.

हेही वाचा >>> लोकसभा निवडणुकीची धामधूम…राज ठाकरे, शरद पवार नाशिक दौऱ्यावर

घराणेशाहीविरोधात भाजप असल्याचा दावा करणाऱ्यांनी हे सांगावे की, शहा यांचा मुलगा कधी क्रिकेट खेळला नसताना देशातील क्रिकेट संघटनेचा प्रमुख कसे करण्यात आले, हे घराणेशाहीमुळेच घडले ना, महाराष्ट्रात लोकसभेच्या ४० पेक्षा अधिक जागा जिंकण्याचा दावा करणाऱ्या भाजपमध्ये दम होता तर त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका का घेतल्या नाहीत, असे प्रश्न पटोले यांनी उपस्थित केले. लोकसभा जागा वाटपासंदर्भात महाविकास आघाडीत कुठलाही वाद नाही. उलट महायुतीमधील अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांची भाजपने काय हालत केली, ते बघा. त्यांना आमच्या जागा तरी द्या, म्हणण्याची वेळ येत आहे, असा टोलाही पटोले यांनी हाणला.

हेही वाचा >>> बेकायदेशीर भूसंपादन, शैक्षणिक आरक्षण बदल, बदल्या; नाशिक मनपाविरोधात छगन भुजबळ यांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एकिकडे आदर्श घोटाळा लोकसभेत काढल्यावर दुसरीकडे, अशोक चव्हाण यांना राज्यसभेचा खासदार केले. त्यामुळे भ्रष्ट व्यवस्थेला ताकद देण्याची भाजपची योजना आहे. जरांगे पाटील यांच्यासाठी नव्हे तर, एकनाथ शिंदे यांच्यासाठी एसआयटी लावली आहे. जरांगे आणि मुख्यमंत्र्यामध्ये काय संभाषण झाले, हे जाहिर केले पाहिजे. हे सर्व  एकनाथ शिंदे यांच्या विरोधात भाजपचे  एसआयटी षडयंत्र आहे. काँग्रेसचा कर्नाटकमधील गॅरंटी हा शब्द भाजपने चोरला आहे. मणीपूर ते मुंबई ही राहुल गांधी यांची न्याय यात्रा महाराष्ट्रात येत असून यात्रेचे भव्य स्वागत व्हावे, ही भूमिका जनतेची असल्याने तयारीचा आढावा घेत असल्याचे पटोले यांनी सांगितले.